Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार

Former President Pratibha Patil: प्रतिभा पाटील यांचे ८९ वर्षे वय आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणं शक्य होणार नसल्यामुळे त्यांना घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Former President Pratibha Patil
Pratibhatai Patil Saam TV
Published On

सागर आव्हाड, पुणे

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Former President Pratibha Patil) पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. पुण्यातल्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Assembly Constituency) मतदार यादीत त्यांचे नाव आहे. प्रतिभा पाटील यांचे ८९ वर्षे वय आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणं शक्य होणार नसल्यामुळे त्यांना घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या १३ मे रोजी पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. १३ मे या मतदान दिवसाच्या पूर्वसंध्येला १२ मे रोजी निवडणूक अधिकारी घरी जाऊन टपाली मतदानाप्रमाणे त्यांचे मतदान करुन घेणार आहेत. या मतदानाचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Former President Pratibha Patil
Narendra Modi : नकली शिवसेना-राष्ट्रवादीने राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण धुडकावलं; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घरातूनच मतदान करणार आहेत. घरातून मतदान करण्यात यावे यासाठी प्रतिभा पाटील यांच्याकडून आवश्यक १२ ड फॉर्म जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे.

Former President Pratibha Patil
Sharad Pawar यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्यामुळे घरातून मतदान करण्याकरीता १२ ड फॅार्म प्रतिभा पाटील यांनी भरून दिला आहे. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता त्या घरातूनच मतदान करणार आहेत. दरम्यान, ८५ पेक्षा जास्त वय असलेले नागरीक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या नागरीकांसाठी यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत घरातून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

Former President Pratibha Patil
Nashik News: तिढा कायम! नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यावरुन महायुतीच्या दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com