''पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणं हा कॉंग्रेसचाच प्रोपगंडा'' - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा Saam Tv News
देश विदेश

''पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणं हा कॉंग्रेसचाच प्रोपगंडा'' - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा

महागाई सारखं काहीच नाहीये, महागाई ही फक्त कॉंग्रेसची मानसिकता आणि प्रोपगंडा आहे असा अजब दावा भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोपाळ : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर उर्फ साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा अजब दावा केला आहे. ''पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणं हा कॉंग्रेसचाच प्रोपगंडा'' आहे असं अजब वक्तव्य त्यांनी केलं आहे. भोपाळ महानगरपालिकेच्या एका ऑनलाईन कार्यक्रमांत त्या बोलत होत्या. ("Raising petrol-diesel rates is Congress propaganda" said BJP MP Sadhvi Pragya)

हे देखील पहा -

देशातील सामान्य जनता पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे, घरगुती इंधन महागल्यामुळे आणि एकुणच महागाईमुळे त्रस्त असताना महागाईसारखा काही प्रकारच नाहीये, ही केवळ कॉंग्रेसची मानसिकता आहे असा जावईशोध भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांनी लावला आहे. भोपाळ महानगरपालिकेच्या बस लोकार्पणाच्या सोहळ्यात त्या दुरदृश्य प्रणालीने सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमात मध्यप्रेदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, हे लोक जे प्रोपगंडा पसरवत आहेत की पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय. महागाई वगैरे काही नाहीये, ही काँग्रेसची मानसिकताच आहे. फुकटचा प्रोपगंडा आहे. त्याचबरोबर प्रदुषणमुक्त गाड्या उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री चौहान यांचे आभारही मानले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT