Rain File Photo Saam Tv
देश विदेश

India Rain Update: देशभरात मान्सून सक्रिय; आज अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Rain Update News: अनेक राज्यांमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे

Shivani Tichkule

Monsoon Update: मान्सूनने आता महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबईत आजही दिवसभर पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर, मुंबई, मांडला, सोनभद्र, बक्सर, सिद्धार्थनगर, पंतनगर, बिजनौर, यमुनानगर, उना, द्रास, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचा बहुतांश भाग, उर्वरित बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, काश्मीर, लडाख, चंदीगड, दिल्ली यासह हरियाणा, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांसाठी पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update)

हवामान विभागाने आज (25 जून) ओडिशा आणि उत्तराखंडमधील वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. झारखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, छत्तीसगढ येथे आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्य आहे.

IMD ने आज हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पूर्व राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Marathwada University : ५५ महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित; शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

अमरावतीत राजकीय भूकंप! रवि राणांच्या पक्षाची ताकद वाढली, काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT