रणजीत माजगावकर, प्रतिनिधी...
Sangli NCP Activist Death Case Update: काही दिवसांपूर्वी सांगलीत नालसाब मुल्ला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर तब्बल आठ गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खूनप्रकरणातील सूत्रधार सचिन डोंगरे याला मोका न्यालयाच्या परवानगीनुसार विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती पोलिसांच्या समोर आली आहे. ज्यामधून डोंगरे हा कळंबा कारागृहातून मोबाईलवरून हल्लखोरांसह अन्य गुन्हेगारांशी संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील (Sangli) नालसाब मुल्ला या युवकाचे शंभर फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. आठवड्यापुर्वी तो वाचनालयाजवळ थांबला असताना त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एलसीबीच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तिघांना अटक केली. या हल्लेखोरांनी गुन्ह्याची कबुली देताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असा रचला होता कट...
स्वप्निल मलमे तीन साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्निल व सनी यांनी आठ गोळ्या झाडल्या. विशाल कोळपेने धारदार एडक्याने हल्ला चढवला. त्यात मुल्लाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या मदतीसाठी आणखी तिघे दबा धरून बसल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. तिघांनाही सापळा रचून अटक करण्यात आली. हल्लेखोरांनी खुनाची कबुली दिली आहे.
कळंबा जेलमधून रचला कट...
खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा ‘मोका’ कारवाईअंतर्गत कळंबा जेलमध्ये आहे. तेथूनच त्याने कट रचल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली. त्यानुसार मोका न्यायालयाच्या परवानगीनुसार त्याला आज अटक करण्यात आली.
दरम्यान, तपासात अनेक कंगोरे समोर आले. डोंगरे हा मोबाईलवरून संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली आहे. कुख्यात गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.