Rain Alert saam tv
देश विदेश

Rain Alert : ऐन थंडीत या भागात ४ ते ५ दिवस कोसळणार तुफान पाऊस; महाराष्ट्रात पुढील २४ तासांत कसं असेल हवामान?

Weather Alert in India : ऐन थंडीत देशातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातही पुढच्या २४ तासांत हवामानात बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडीनं उत्तर भारतातून जवळपास काढता पाय घेतला आहे. भरदिवसा कडक ऊन पडत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत देशाच्या डोंगराळ भागातील वातावरण अचानक बदलू शकतो. येत्या ८ तारखेला नव्यानं थंडी आणि पावसाचा 'खेळ' सुरू होणार आहे. त्यामुळे हिमालयाच्या पश्चिम भागात ८ ते १२ अर्थात पाच दिवस तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मागच्या 24 तासात पश्चिम हिमालय, पश्चिम मध्य प्रदेश ,मेघालय, ओडिशामध्ये दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. तर उत्तराखंडमध्ये अतिप्रमाणात थंडी होती. तर जम्मू काश्मीर, लडाख , हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम या ठिकाणी 6 आणि 7 फेब्रुवारीला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर 8 फेब्रुवारीच्या दरम्यान मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे 8 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर पश्चिम भारतात आणि महाराष्ट्रात पुढच्या 24 तासानंतर हवामानात बदल होईल आणि किमान तापमानात तीन अंशांनी वाढ होईल आणि येत्या तीन दिवसांत मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार आहे.

याशिवाय पुढील दोन दिवसांत पूर्व भारतातील किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होणार असून, गुजरातमध्ये येत्या दोन दिवसांत किमान तापमानात तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत दाट धुके दिसून येईल. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये ६ फेब्रुवारीला थंडीची लाट येणार आहे.

राजस्थानच्या अनेक भागात थंडीची लाट कायम

राजस्थानच्या अनेक भागात हिवाळा अजूनही सुरू आहे. गेल्या 24 तासांत जयपूर आणि कोटा विभागात अनेक ठिकाणी थंडीची लाट नोंदवण्यात आली. सीकर जिल्ह्यातील फतेहपूर येथे या कालावधीत किमान तापमान 2.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्याचे हवामान खात्याने सांगितले. तर सीकरमध्ये किमान तापमान 3.5 अंश, नागौर आणि लुंकरानसारमध्ये 3.8 अंश, करौलीमध्ये 4.4 अंश, दौसामध्ये 5.1 अंश आणि सांगरियामध्ये 5.2 अंश होते. राज्यभरात अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले गेले. राजधानी जयपूरमध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 24.9 अंश आणि 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT