rain alert for 17 states imd warns of storms hail and strong winds saam tv
देश विदेश

Rain Alert india : पुढील २ दिवस सतर्क राहा! १७ राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट, गारपीटीचा तडाखाही बसणार

Rain alert for 17 states over next two days : भारतीय हवामान विभागाने पुढील २ दिवसांसाठी १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ८० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

Rain Alert in 17 States : मान्सूननं केरळमध्ये धडक दिली आहे. त्यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. काही राज्यांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आता पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशासह १७ राज्यांमध्ये वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, मोठे नुकसान होऊ शकते, असाही अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ८० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. या काळात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. वादळी पाऊस सुरू असताना शेतकरी आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे, असेही सांगण्यात आले आहे. वादळी पावसासह काही राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

जूनचा पहिला आठवडाही संपत आला तरी अनेक राज्यांमध्ये अजूनही ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. कधी ऊन्हाचे चटके तर कधी शिडकाव्यामुळं गारवा पसरत आहे. काही दिवसांपूर्वी बऱ्याच राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. मात्र, पावसाच्या सरींमुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानुसार, येत्या दोन दिवसांत १७ राज्यांत पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, ओडिशा, केरळ, त्रिपुरा या राज्यांना अलर्ट दिला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, आसाम आणि केरळमध्ये ६ जून रोजी वादळी पावसाचा अलर्ट दिला आहे. या काळात या राज्यांतील काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित बिहार, झारखंड, हरयाणा, जम्मू-काश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्ये ६ आणि ७ जून या दोन दिवसांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

अनेक राज्यांत उद्या आणि परवा असे दोन दिवस वेगवान वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. या कालावधीत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT