Uttar Pradesh Railway Accident Saam TV
देश विदेश

Railway Accident : उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघात, मालगाडी रुळावरून घसरली; लखनौ-दिल्ली रेल्वे मार्ग बंद

Uttar Pradesh Railway Accident : उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघात झाला असून मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले आहेत.

Satish Daud

उत्तर प्रदेशात रेल्वे अपघाताचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अगदी दोन-तीन दिवसांपूर्वी चंडीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे तब्बल ८ डबे रुळावरून घसरले होते. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता गोंडाहून गाझियाबादला जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे रुळावरून घसरले आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, मालगाडी घसरल्याने रेल्वेरुळ उखडून गेला आहे. त्यामुळे लखनौ-दिल्ली रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर या अपघाताचा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेप्रशासन सतर्क झाले असून रेल्वे अधिकारी आणि जीआरपी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा येथून टँकर आणि कंटेनरला घेऊन अपघातग्रस्त मालगाडी गाझियाबादकडे निघाली होती.

रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास मालगाडी अमरोहा स्थानकाजवळ आली. त्यावेळी मालगाडीचे तब्बल १२ डबे एकापाठोपाठ एक रेल्वेरुळावरून खाली घसरले. यामुळे मोठा आवाज झाला. सुदैवाने इंजिन रुळावरून घसरले नाही. त्यामुळे अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर मालगाडीचे डबे डाऊन मार्गावर विखुरले गेले.

त्याचवेळी काही खांबांना तडे गेल्याने रेल्वेचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डीएम राजेश त्यागी, एसपी कुंवर अनुपम सिंह आणि एडीएम सुरेंद्र सिंह आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांची परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत मालगाडीला रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू होते.

अपघातानंतर अमरोहा मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. दिल्ली-लखनौ रेल्वे मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला. एकाच आठवड्यात दोन मोठे रेल्वे अपगात झाल्याने उत्तरप्रदेशात मोठी खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, एवढी मोठी घटना घडल्यानंतरही रेल्वेकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. सध्या परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT