Rahul Gandhi Protest. saam tv
देश विदेश

PM मोदी आता सुटू शकणार नाहीत, यावेळी तर अजिबातच नाहीत; पंतप्रधानांच्या घराबाहेरूनच राहुल गांधींचा निर्वाणीचा इशारा

Rahul Gandhi Protest : दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांसह तरूणांवरील लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेरच ठिय्या मांडला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच इशारा दिला आहे.

Nandkumar Joshi

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेरच त्यांनी ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावर झालेला हल्ला आहे. कोणतेही उत्तर न देता, कोणत्याही परिणामांना सामोरे न जाता ते यातून सुटतील असं पंतप्रधान मोदींना वाटत आहे. पण यावेळी नक्कीच नाही. आता तर अजिबातच नाही, असा निर्वाणीचा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच एक्सवर एक पोस्ट केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या घटनेवर ते प्रचंड आक्रमक झालेले दिसले. विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला असून, आपण याबाबत काहीही उत्तर दिलं नाही तरी, कोणत्याही परिणामांना सामोरे न जाता यातून सहीसलामत सुटणार असल्याचं पंतप्रधान मोदींना वाटतंय. पण ते तसे करू शकत नाहीत. यावेळी तर अजिबातच नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा असे ज्यांना वाटत आहे, त्या प्रत्येक देशभक्त भारतीयांना मी आवाहन करतो. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आम्ही धरणे धरले आहेत, त्यात सहभागी व्हा. भारतीय विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, असेही राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT