Karnataka Elections Result Saam TV
देश विदेश

Modi vs Gandhi: कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे अच्छे दिन सुरू; २०२४ मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा

Rahul Gandhi vs Narendra Modi: आगामी २०२४ लोकसभा निवडणूक काबिज करण्यासाठी रणनिती आखणाऱ्या भाजपला कर्नाटकात मोठा झटका बसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi vs Narendra Modi: आगामी २०२४ लोकसभा निवडणूक काबिज करण्यासाठी रणनिती आखणाऱ्या भाजपला कर्नाटकात मोठा झटका बसला आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपच्या सत्तेला सुरूंग लावला. एकीकडे भाजप काँग्रेस मुक्त अभियानाच्या मोठमोठ्या गोष्टी करत असताना, दुसरीकडे काँग्रेसने आता भाजपमुक्त अभियानास सुरूवात केली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसने यापूर्वी राजस्थान, छत्तीगड आणि हिमाचल प्रदेशची सत्ता काबिज केली. यानंतर आता कर्नाटकात सुद्धा भाजपला मोठा दणका दिला. दुसरीकडे बिहारमध्येही महाआघाडीचे सरकार आहे. यात काँग्रेसला धार आली आहे यात शंका नाही. आता या राजकीय खेळीत काँग्रेस आपली धार किती काळ टिकवते हे पाहावे लागेल.

भाजपला लोकसभेत सर्वात मोठा धक्का देण्यासाठी देशातील अनेक पक्ष एकत्र येत आहेत. आता प्रश्न असा आहे की, भाजपविरोधात विरोधकांकडून जी महाआघाडी उभारण्याची कसरत सुरू आहे. त्याचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विरोधकांसमोर आहे.

राहुल गांधी बनणार पंतप्रधान पदाचे उमेदवार?

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे विरोधक सुद्धा भाजपला पराभूत करण्यासाठी एकजूट असल्याचं दिसत आहे. मात्र, २०२४ मध्ये मोदींच्या विरोधात पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र, आज कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने राहुल गांधी हेच नरेंद्र मोदींना चांगली टक्कर देऊ शकतात, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी मेहनत घेतली तरी प्रियांका गांधीचेही या विजयात मोठे योगदान आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रेमुळे कर्नाटकात काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे. हिमाचलच्या निवडणुकीतही भाजपने राहुल गांधीच्या पदयात्रेची खिल्ली उडवली होती. पण तेथील निवडणुकीतही काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला.

राहुल गांधींच्या पदयात्रेवर भाजपने ज्या प्रकारे टीका केली. त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं म्हटलं. तीच चूक भाजपच्या अंगलट आली. भारत जोडो यात्रेतून सर्वसामान्यांवर प्रभाव पाडणाऱ्या राहुल गांधींनी आपण आता पप्पू राहिलो नाही, असं ठामपणे सांगितलं. जरी त्यांच्या या विधानावर विनोद झाले असले तरी, राहुल गांधी फेस लिफ्ट झाल्याचं दिसतंय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT