Lawrence Bishnoi Rahul Gandhi:  Saamtv
देश विदेश

Rahul Gandhi News: राहुल गांधी लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर! जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ; काँग्रेस आक्रमक

Lawrence Bishnoi Rahul Gandhi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोसह राहुल गांधी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Gangappa Pujari

Lawrence Bishnoi Threat To Rahul Gandhi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारल्यानंतर लॉाक खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. अशातच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी हे बिश्नोईच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. एका फेसबुक पेजवरुन राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बिश्नोईच्या नावाने राहुल गांधींना धमकी

बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुन्हा एकदा देशात चर्चेत आहे. अशातच काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोसह राहुल गांधी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेस आक्रमक

एनएसयूआय पूर्व उत्तर प्रदेशचे अध्यक्ष ऋषभ पांडे यांनी सांगितले की, बुद्धादित्य मोहंती नावाच्या युजरने वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच लॉरेन्स बिश्नोईचा फोटो पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधींसोबतच राहुल गांधी तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबतही असेच म्हटले आहे.

गुन्हा दाखल

जर्मनीकडे गेस्टापो, इस्रायलकडे मोसाद, यूएसएकडे सीआयए आणि आता भारताकडे लॉरेन्स विश्नोई आहे. पुढचे नाव ओवेसी आणि राहुल गांधी यांचे असावे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, "राहुल गांधी प्रत्येक समाजातील लोकांना सोबत जात आहेत, संविधानाच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत आणि अशा परिस्थितीत ते देशाची सर्वात मोठी आशा आहेत. त्यांच्याविरोधात असा विचार आम्ही कदापी खपवून घेणार नाही. एफआयआर व्हावी, अशी आमची मागणी आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर लवकरच गुन्हा दाखल करा, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT