Rahul Gandhi News, Priyanka Gandhi News Saam TV
देश विदेश

Congress: अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत हा नेता, राहुल गांधींना देणार कडवे आव्हान!

काँग्रेस (Congress) पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: काँग्रेस (Congress) पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. नव्या अध्यक्षांची निवड १७ ऑक्टोबरला होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. २०२० मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनात्मक सुधारणांची मागणी करणाऱ्या २३ नेत्यांत शशी थरूर यांचाही समावेश होता.

शशी थरूर यांनी अद्याप काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. शशी थरूर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, मात्र ते लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकतात. शशी थरूर यांनी मात्र या निवडणुकीत सहभागी होणार की नाही यावर भाष्य करण्यास नकार दिला, आहे.

शशी थरूर यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी 'मुक्त आणि निष्पक्ष' निवडणुकांचे आवाहन केले आहे. या लेखात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत.

'एआयसीसी आणि पीसीसी प्रतिनिधींकडून घेतलेल्या या महत्त्वाच्या पदांवर पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे पक्षाच्या सदस्यांना ठरवण्याची मुभा देणे, यामुळे येणाऱ्या नेत्यांच्या गटाला वैध ठरवण्यास आणि पक्षाचे नेतृत्व करण्यास मदत होईल. विश्वासार्ह आदेश आहे, असंही शशी थरुर यांनी म्हटले आहे.

नव्या अध्यक्षांची काँग्रेसला(Congress) नितांत गरज आहे, निवडणुकीसाठी अनेक उमेदवार पुढे येतील अशी माझी अपेक्षा आहे. पक्षासाठी आणि देशासाठी आपले विचार मांडल्यास जनहित नक्कीच जागृत होईल, असंही थरुर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT