Rahul Gandhi On Voter Fraud Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

Voter Fraud: राहुल गांधींनी महाराष्ट्रात व्होट चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली खरी पण मतदार यावर समाधानी नसल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

भरत मोहळकर, साम टीव्ही

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेतील टोकदार प्रश्नांनी मुख्य निवडणूक आयुक्त घायाळ झाल्याची चर्चा रंगलीय. या पत्रकार परिषदेतील कोणत्या प्रश्नांची चर्चा सुरुय? पाहूयात...

राहुल गांधींनी महाराष्ट्रात व्होट चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप केला आणि निवडणूक आयोग चर्चेत आलं. मात्र राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता बिहारमधून व्होट अधिकार यात्रा काढत निवडणूक आयोगाला खिंडीत गाठलंय. त्यामुळे आपली पत राखण्य़ासाठी निवडणूक आयोगाने थेट पत्रकार परिषद घेऊन गांधींचे आरोप फेटाळून लावलेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले असले तरी या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार परोंजय गुहा ठाकुरता यांनी विचारलेले प्रश्न लक्षवेधी ठरलेत.

एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने कान उपटल्यानंतरच बिहारमधील मतदार पुनर्पडताळणीतील वगळलेली नावं वेबसाईटवर टाकण्यासंदर्भातही प्रश्न विचारलाय. दुसरीकडे महाराष्ट्रातील व्होट चोरीच्या प्रश्नांवर निवडणूक आयोगानं मौन पाळलंय त्यावरही या पत्रकार परिषदेत बोट ठेवण्यात आलंय. महाराष्ट्रासंदर्भातील व्होट चोरीच्या प्रश्नाला आयोगाने बगल दिलीय. मात्र आयोगाच्या पत्रकार परिषदेतील हेच प्रश्न विरोधकांनी उचलून धरलेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या उत्तरावर ज्येष्ठ पत्रकार परोंजय गुहा ठाकुरतांनी मात्र असमाधान व्यक्त केलंय.

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने तब्बल 1 तास 25 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेतून समाधानकारक उत्तर मिळाली का. जी उत्तर दिली ती पटण्याजोगी होती का? महाराष्ट्रासंर्दभातील प्रश्नाला निवडणूक आयोगानं का बगल दिली. असे अनेक प्रश्न मात्र या पत्रकारपरिषदेनंतरही अनुत्तरीच राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

SCROLL FOR NEXT