राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीला यावं, अशी विनंती महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली. संसदेत राहुल गांधी यांची भेट राज्यातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी घेतली. त्यावेळी राज्यातील इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी शरद पवारही उपस्थित होते.
राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान महत्त्वाची चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान शरद पवार यांच्याोबत प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते हे देखील उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची मंगळवारी संध्याकाळी भेट झाली. या भेटीदरम्यान, पंढरपूरच्या वारीला राहुल गांधी यांना येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते हेही या भेटीदरम्यान उपस्थित होते. संसदेत राहुल गांधी यांची भेट घेण्यात आली. दरम्यान, वारीला येण्याबाबत बाबत लवकर आपल्याला कळवतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटल्याचं कळतंय. त्यामुळे आता राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रपती अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अग्निवीर योजनेवरुन जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला नरेंद्र मोदी यांच्याकडूनही लोकसभेत प्रत्युत्तर देण्यात आलं.
राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवरुन झालेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवार भेटीला राजकीय महत्त्वही प्राप्त झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.