लुधियाना: पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आली आहे. राहुल गांधींच्या चालत्या गाडीवर एका व्यक्तीने झेंडा फेकला, जो राहुल गांधींच्या चेहऱ्याला लागला. काल (रविवार) लुधियानामध्ये राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली होती.
राहुल गांधींच्या गाडीवर कोणी फेकला झेंडा?
ज्या व्यक्तीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चालत्या गाडीवर झेंडा फेकला तो युवक काँग्रेस नेते नदीम खान असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. राहुल गांधींना इजा करण्याचा आपला हेतू नव्हता, असे सांगून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
राहुल गांधींच्या सुरक्षेत कसली चूक?
राहुल गांधींचा ताफा निघण्यापूर्वी ट्राफीक क्लिअर केले नव्हतं का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत (Security) ही चूक कशी झाली?
व्हिडीओमध्ये, राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला उभे होते आणि राहुल गांधींची गाडी जवळ येताच युवक काँग्रेसचे नेते नदीम खान यांनी त्यांच्या ताफ्यावर झेंडा फेकला.
पोलीस बंदोबस्तात त्रुटी
विशेष म्हणजे पंजाब (Punjab) हे सीमावर्ती राज्य आहे. लुधियाना हे पंजाबचे ते क्षेत्र आहे जिथे आधीच अलर्ट जारी आहे. असे असतानाही व्हीआयपींच्या ताफ्याचं मार्गक्रमण करताना पोलिसांच्या बंदोबस्ताच त्रुटी होती, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
राहुल गांधींसोबत नवज्योत सिंग सिद्धू, सुनील जाखड आणि सीएम चरणजीत सिंह चन्नी हे देखील कारमध्ये होते. राहुल गांधी कारच्या पुढच्या सीटच्या डाव्या बाजूला बसले होते. राहुल गांधींच्या गाडीजवळ जाण्यापासून पोलीस कोणत्याही कार्यकर्त्याला रोखत नसल्याचंही दिसून आलं.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.