Rahul Gandhi  Saam Digital
देश विदेश

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

Rahul Gandhi On PM Modi : अदानी- अंबानींवरील टीका टाळण्यासाठी किती पैसा घेतला होता, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केला होता. त्यावर राहुल गांधींनी व्हिडिओच शेअर करत नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे.

Sandeep Gawade

राहुल गांधी आणि काँग्रेस निवडणुकीआधी अदानी आणि अंबानींवरून भाजपवर आरोप करत होते. मात्र निवडणुका सुरू झाल्यापासून त्यांच्यावरून टीका करणं सोडून दिलं आहे. अदानी- अंबानींवरील टीका टाळण्यासाठी किती पैसा घेतला होता, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केला होता. त्यावर राहुल गांधींनी व्हिडिओच शेअर करत नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि झारखंडमधील भाषणाचे हे व्हिडिओ असून अदानी-अंबानीचा कितीतरी वेळा उल्लेख केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी आधी बंद खोलीत अदाणी आणि अंबानी यांची भेट घेत होते. आज पहिल्यांदा जनतेत तुम्ही त्यांची नावं घेतली. अदाणी आणि अंबानी टेम्पोमध्ये पैसे देतात अस तुम्ही म्हणाले, हा तुमचा पर्सनल अनुभव आहे का? असा सवाल राहुल गांदी यांनी केला आहे. CBI आणि ED ला यांच्याकडे पाठवून सगळी चौकशी करा. यांनी २२ अरबपती बनवले आहेत आम्ही करोडो लखपती बनवणार, असं उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या टीकेला दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या करिमगनमधील प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मागील पाच वर्षांपासून भाजपवर टीका करत आहेत. अदानी अंबानींवरून टीका करत आहेत. मात्र आता निवडणूक सुरू झाल्यापासून टीका करणं सोडून दिलं आहे. आता यांनी निवडणुकीत अदानी अंबानींकडून पैसे घेतले का ? अशी टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली होती. त्यावर राहुल गांधींनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds Side Effects: हेल्दी समजून चिया सीड्स जास्त खाताय? मग, आरोग्याला होऊ शकतात हे ७ गंभीर आजार

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी संध्याकाळनंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, नाहीतर...

Parking Rules : सोसायटीतील पार्किंगवरून वाद, फ्लॅट घेतल्यानंतर गाडी कुठे उभी करायची? पाहा काय सांगतो नियम

DA Hike: दिवाळीपूर्वी पुन्हा वाढणार महागाई भत्ता? कर्मचाऱ्यांना मिळाले पगारवाढीचे हे संकेत

Maharashtra News Live Update: नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन

SCROLL FOR NEXT