Rahul Gandhi Saam Digital
देश विदेश

Rahul Gandhi : अर्थसंकल्प सादर होताच राहुल गांधी अॅक्शन मोडवर; शेतकरी नेत्यांची बोलावली तातडीची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Rahul Gandhi Meeting With Farmers : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी १.५ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र MSP बाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राहुल यांनी चर्चा करण्यासठी आज शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली होती.

Sandeep Gawade

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १.५ लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र MSP बाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

मोदी सरकारच्या तीसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. त्यावर संसदेत आजपासून चर्चा होणार आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसने अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी ४ तासांची वेळ मागीतला आहे.

दरम्यान शेतकरी नेत्यांसोबत राहुल गांधी यांची बैठक संपली आहे. राहुल गांधी यांनी, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर इतर विरोधी पक्षांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. त्यामध्ये प्रायवेट मेंबर बिलाचाही समावेश आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. राहुल गांधी यांच्यासोबत MSP सह अन्य मागण्यांवर चर्चा झाल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.

दरम्यान राहुल गांधी यांनी आरोप केला होता की, विरोधी पक्षनेता असल्यामुळे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं होतं, मात्र शेतकऱ्यांना पास मिळत नसल्यामुळे त्यांना भेटता येत नाही. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जात असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांना बास दिले जाणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे केसी वेणुगोपाल म्हणाले की, अर्थमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत. अर्थसंकल्पात काही मुद्दे गायब आहेत. त्याबाबत संपूर्ण देशाच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच विरोधक विरोध करत असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT