Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून अचानक वायनाडला रवाना, काय आहे कारण?

Rahul Gandhi Went For Wayanad: कॉंग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून वायनाडला रवाना झाले आहेत. यामागे काय कारण आहे, ते आपण जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

Rahul Gandhi Left Bharat Jodo Nyaya Yatra

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातून जात आहे. राहुल गांधी अचानक आपल्या प्रवासाला ब्रेक लावून वायनाडला रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ते प्रयागराज येथून पुन्हा प्रवासाला सुरुवात करणार आहे. (latest political news)

शनिवारी त्यांच्या यात्रेचा मार्ग (Bharat Jodo Nyaya Yatra) वाराणसी ते उत्तर प्रदेशातील भदोही असा होता. पण, अचानक राहुल गांधी वायनाडला गेले आहेत. त्यांनी मध्येच प्रवास थांबवला आहे. राहुल गांधी वायनाडला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रयागराजहून पुन्हा सुरू होणार प्रवास

राहुल गांधींच्या वायनाड भेटीची माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, वायनाडला राहुल गांधींच्या उपस्थितीची गरज आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता ते वाराणसीहून वायनाडला रवाना (Rahul Gandhi Went For Wayanad) झाले आहेत. राहुल गांधी आज दुपारी ३ वाजता प्रयागराज येथून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू करतील.

काँग्रेसची यात्रा शुक्रवारी उत्तर प्रदेशात दाखल झाली होती. यानंतर ही यात्रा रायबरेलीमार्गे राजस्थानमध्ये प्रवेश करणार (Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra) आहे. भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी 2024 रोजी सुरू झाली होती. काँग्रेसचा हा प्रवास 15 राज्यांतून 6,700 किलोमीटरचे अंतर कापून मुंबईत संपणार आहे. वाटेत सर्वसामान्यांना भेटून 'न्याय'चा संदेश ठळकपणे मांडणे, हा या यात्रेचा उद्देश आहे.

जंगली हत्तींच्या हल्ल्यात गार्डचा मृत्यू

वायनाड येथे शुक्रवारी सकाळी जंगली हत्तींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याचा कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर राहुल गांधींनी (Rahul Gandhi News)आपल्या लोकसभा मतदारसंघात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मृत व्यक्तीची माहिती देताना वन अधिकाऱ्याने सांगितले की, तो वन विभागाचा इको-टुरिझम गाईड होता. तो कुरुवा बेटावर प्रसिद्ध पर्यटन स्थळावर तैनात होता.

त्याचवेळी जंगली हत्तींच्या हल्ल्यात इको-टूरिझम गाईडचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष यूडीएफ आणि भाजपने सर्वसामान्यांवर होणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हास्तरीय बंदची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT