ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन
सत्ताधाऱ्यांविरोधातील आंदोलनाचा राहुल गांधी प्रमुख चेहरा
एसआयआरच्या मुद्द्यावर विरोधकांची एकजूट
आठ तासांच्या ठिय्यानंतर आकाशवाणी भवनात पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह राहुल गांधीं आणि प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं. चारही बाजूला पोलिस आणि मध्ये राहुल गांधींचा डॅशिग अवतार. एखाद्या चित्रपटातील नायकाला पोलिस ओढून नेतायत. असाच काहीसा प्रकार दिल्लीत पाहायला मिळाला.300 खासदारांनी आधीच आंदोलनस्थळी ठिय्या मांडून पोलिसांच्या नाकीनऊ आणलं होतं..त्यात तब्बल अर्धा तास पोलिस आणि राहुल गांधींसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि अखेर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र अटकेनंतर राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं.
गद्दारांना वाचवण्यासाठी, उरल्यासुरल्या लोकशाहीच्या अस्तित्वालाच चिखलात ढकललं जातयं. याचा हिशोब नक्कीच चुकता केला जाईल. एकाही देशद्रोह्याला सोडणार नाही. मुळात 2014 आणि 2019 ला साधं विरोधी पक्षनेते पद न मिळवू शकणारे विरोधक आता मात्र विरोधी पक्षनेता राहुल गांधींच्या आक्रमकतेमुळे सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी जेरीस आणतायत.कधी काळच्या पप्पू प्रतिमेला छेद देत राहुल गांधीनी थेट रस्त्यावर येऊन लढायला सुरवात केलीय.
1 ऑक्टोबर 2020- शेतकरी आंदोलनादरम्यान यूपी पोलिसांकडून अटक
26 जुलै 2022- ईडी चौकशीच्या निषेधार्थ राजपथावर आंदोलनादरम्यान ताब्यात
5 ऑगस्ट 2022- बेरोजगारी आणि GST विरोधातील आंदोलनादरम्यान अटक
24 जानेवारी 2024 - आसाममध्ये 'भारत जोडो'दरम्यान पोलिसांकडून राहुल गांधींवर FIR दाखल
21 जुलै 2026 - नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनात अटकेची कारवाई
21 ऑगस्ट 2026- नीट प्रकरणातील आंदोलक साहिलच्या डोळ्याला पॅलेट गनमुळे इजा झाल्यावर राहुल गांधींचा दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनवर ठिय्या
21 ऑगस्ट 2026- तब्बल 8 तासाच्या ठिय्यानंतर राहुल गांधींमुळे साहिलची FIR नोंदवून घेतली
6 ऑक्टोबर 2026 - निवडणूक आयोगाच्या विरोधातील मार्चदरम्यान दिल्ली पोलिसांकडून ताब्यात
राहुल गांधीची ही लढाऊ वृत्ती त्यांच्या देहबोलीतूनही वेळोवेळी समोर आली आहे. रस्त्यावरचा डॅशिंग 'विरोधी पक्षनेता' या प्रतिमेमुळे कॉग्रेसबरोबरच इंडीया आघाडीलाही उभारी मिळालीय. एकंदरित देशामधील बेरोजगारी, महागाई, NEET सारख्या परीक्षांमधील घोटाळे आणि घटनात्मक संस्थांचा राजकीय वापर याविरोधात जनतेमध्ये विशेषत: तरूणांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाला राहुल गांधींनी रस्त्यावरच्या लढाईतून वाचा फोडली.
त्यामुळे 2024ला विरोधकांना मिळालेल्या संख्याबळानं देशाला फक्त विरोधी पक्ष मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरून जनतेच्या हक्कासाठी थेट सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून सवाल विचारणारा 'जनतेचा विरोधी पक्षनेता' दिलाय. आता भविष्यात 5 राज्याच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या या भूमिकेमुळे विरोधकांना कसा फायदा होतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.