RAHUL GANDHI INJURED DURING DELHI PROTEST; CONGRESS ALLEGES POLICE MANHANDLING saam tv
देश विदेश

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Rahul Gandhi Injured During Protest: आंदोलनाच्या ठिकाणाहून राहुल गांधींना हटवले जात असताना दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. यावेळी राहुल गांधी जखमी झाले. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले गेले.

Bharat Jadhav

  • आंदोलनस्थळावरून हटवताना राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

  • राहुल गांधी यांच्या नाकाला दुखापत होऊन रक्त निघाल्याचा आरोप करण्यात आला.

  • प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांनी उचलून पोलीस व्हॅनमध्ये कोबलं. आंदोलनस्थळावरून हटवताना राहुल गांधी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यादरम्यान राहुल गांधी जखमी झाले. पोलिसांनी त्यांचे हातपाय पकडून त्यांना पोलीस गाडीत कोंबलं. राहुल गांधींसह प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतलं.

पोलिसांनी या तिन्ही नेत्यांना बसमधून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. राहुल गांधींना आंदोलनस्थळावरून हटवण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. यात राहुल गांधींच्या नाकाला दुखापत झाली असून त्यांच्या नाकातून रक्त निघू लागलं होतं.

प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं

दिल्ली पोलिसांनी सर्वप्रथम राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजुला हटवलं मग त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राहुल आणि प्रियांका यांनाही पोलिसांनी उचलून थेट पोलीस गाडीत कोंबलं. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रियांका गांधी बसच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना बसमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना जोर लावत बसच्या दरवाजात उभ्या राहत होत्या. त्यानंतर, तीन-चार महिला अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं.

दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. "ते भित्रे आहेत. ते घाबरलेले आहेत. आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. त्यांना आमची भीती वाटते.", असा हल्लाबोल प्रियंका गांधींनी केलाय. यासह समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. अखिलेश यादव म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. ते त्यांच्या मागण्या का मान्य करत नाहीत?

निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने राहुल गांधींच्या मागण्या मान्य

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सुरू असलेल्या धरणे आंदोलनात काँग्रेसचे खासदार राहुल गांधीही सहभागी झाले. राहुल गांधींनी आज दुपारी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी आणि त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी सरकारी प्रतिनिधी तेथे पोहोचले. विरोधी पक्षनेत्यांशी झालेल्या या भेटीनंतर, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, राहुल गांधींना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

कारण हे ठिकाण आंदोलनासाठी निश्चित केलेले नाही आणि या निदर्शनामुळे नागरिकांची गैरसोय होतेय. यावेळी जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अवघ्या काही क्षणांतच आणि सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यानंतर राहुल गांधींना त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे आश्वासन देण्यात आले. 'नीट' (NEET) आणि त्याशी संबंधित आंदोलनाशी निगडित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.

राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आले होते. त्यांच्यासमोर राहुल गांधी यांनी ५ मागण्या ठेवल्या होत्या.

1) शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या.

2) आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करावी

3) अधिवेशनामध्ये नीट पेपरफुटीवर चर्चा करा

4) गृहमंत्र्यांनी याविषयी दोन्ही सदनात निवेदन द्यावे.

5)आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर निष्पक्ष चौकशी करावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; मनुस्मृती दहनाचा इशारा

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

SCROLL FOR NEXT