Rahul Gandhi Gujarat Visit: SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते होताच राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पंतप्रधानांच्या बालेकिल्ल्यात भाजपला हरवण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

Rahul Gandhi Gujarat Visit: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Bharat Jadhav

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्याचा दौरा करणार आहेत. गुजरातला भेटीवरुन राहुल गांधींनी थेट मोदींना आव्हान दिलंय. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करेल. असं आव्हान विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिलं होतं.

राहुल गांधींच्या या आव्हानामुळे गुजरात दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण संसदेत हिंदू धर्मावर वक्तव्य केल्यानंतर गुजरात राज्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला होता. त्याचदरम्यान राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेत तेथील पुढील रणनीती ठरवणार असल्याची शक्यता वर्तलवली जात आहे.

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्यांनी राहुल गांधींशी चर्चा केलीय. त्यांनी राहुल गांधींना अहमदाबादला येण्यास सांगितले जेणेकरून ते स्थानिक नेत्यांना भेटू शकतील. त्यांना पाठिंबा देऊ शकतील. ज्या काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या गुंडांचा धैर्याने सामना केला त्यांची राहुल गांधी भेट घेतील. दरम्यान गोहिल यांनी तारखे बाबत कोणतीच माहिती दिली नाही.

भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या पूर्वसंध्येला गांधी शनिवारी अहमदाबादला पोहोचतील असं गोहिल म्हणालेत. गोहिल यांनी सांगितलं की, काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलीस गुन्हे नोंदवत नाहीत. त्यामुळे शक्तीसिंग गोहिल यांनी राहुल गांधींना गुजरातला भेट देण्याचे आवाहन केलंय.

दरम्यान २ जुलै रोजी संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू धर्मांवर केलेल्या विधानावरुन गुजरातमधये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. “जे स्वतःला हिंदू म्हणवतात, ते फक्त हिंसाचारावर बोलतात, असं राहुल गांधी भाजप आणि आरएसएसवर टीका करताना म्हणाले होते. भाजपने राहुल गांधींवर हिंदूंना हिंसक संबोधल्याचा आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT