Gandhi family
Gandhi family  saam tv
देश विदेश

काँग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबीयांबाहेर जाणार की राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होणार ? चर्चांना उधाण

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या प्रमुख्यस्थानी कोण विराजमान होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास तयार नसल्यास, तर पक्षातील कोणत्या नेत्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. सोनिया गांधी या पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार की गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होणार या दृष्टीने देखील विचार केला जात आहे. २० सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण होईल. त्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे.

पक्षाचे नेते हे राहुल गांधी यांच्या होकाराच्या प्रतीक्षेत

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षा म्हणून पक्षाची धुरा हाती घेतली. सोनिया गांधी यांच्यासहित काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली पाहिजे, त्यामुळे पक्षातील नेते राहुल यांच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान न झाल्यास, पक्षातील अन्य नेत्यांच्या गळ्यात अध्यदपदाची माळ देखील पडू शकते. त्या अनुषंगाने देखील चर्चा सुरू आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष न झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत देखील पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती काँग्रेसशी संबंध असलेल्या सूत्रांनी दिली आहे. तसेच गहलोत यांच्या व्यतिरिक्त पक्षातील मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, कुमारी शैलजा आणि अन्य काही नावांचा देखील विचार करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले आहे की, 'राहुल गांधी हे अध्यक्षपदी विराजमान न झाल्यास सोनिया गांधी या आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षा राहू शकतात. तसेच दोन-तीन वरिष्ठ नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जबाबादारी देण्यात येऊ शकते'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT