rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

काँग्रेस देशव्यापी यात्रा काढणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिविरात राहुल गांंधी यांनी संबोधित केले.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : रास्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे (Congress) तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरु आहे. या शिबीरामध्ये देशातून काँग्रेसचे ४०० हून अधिक पदाधिकारी उपस्थित आहेत. या शिबीरात आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी देशव्यापी यात्रा करणार असल्याचे जाहीर केले. 'आपल्याला जनतेत जावे लागणार आहे. त्यांच्या समस्या समजून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ऑक्टोंबर पासून देशव्यापी यात्रा काढणार असल्याचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज जाहीर केले.

आपल्याला जनतेत जावे लागेल. आपण विचार न करता लोकांमध्ये बसून त्यांची समस्या काय आहे हे समजून घेतले पाहिजे, जनतेशी आपला जो संबंध होता तो पुन्हा जोडावा लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षच देशाला पुढे नेऊ शकतो, हे जनतेला माहीत आहे, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

देशातील सरकाने तरुणांना बेरोजगार बनवले आहे. तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. युक्रेन- रशिया युध्दामुळे परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. ऑक्टोंबर पासून जनतेत जावून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यासाठी काँग्रेस (Congress) ऑक्टोंबरपासून देशव्यात्री यात्रा सुरु करणार आहे. काँग्रेसचे जनतेशी असलेलं नातं पुन्हा पूर्ण होईल. राहुल गांधींनी आपल्या भाषणात पंजाबबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेसमध्ये अंतर्गत संवादाला परवानगी आहे. भाजप आणि आरएसएसमध्ये असे काही नाही पण त्यामुळेच काँग्रेसवर अधिक टीका होते, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

''भाजपकडे भरपूर पैसा आहे''

पक्षाच्या रणनीतीतील उणिवा राहुल गांधी यांनी यावेळी मान्य केल्या. भाजप संवादात अधिक चांगला आहे. भाजपकडे भरपूर पैसा असून जनतेशी संवाद साधण्यात ते आमच्यापेक्षा चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्हाला आमचा संवाद सुधारावा लागेल आणि लोकांशी संपर्क साधावा लागेल, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT