Bharat Jodo Nyay Yatra Saam Digital
देश विदेश

Bharat Jodo Nyay Yatra: बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या बिहारमध्ये असून पं. बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाला असून राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. .

Sandeep Gawade

Bharat Jodo Nyay Yatra News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या बिहारमध्ये असून पं. बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाला असून राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. यातून राहुल गांधी थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर ते कारमधून उतरून बसमध्ये बसले आणि पोलिसांनी जवावाला शांत केलं. टीव्ही ९ हिंदीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 18 वा दिवस आहे. त्यांची यात्रा बिहारमधून बंगालमध्ये दाखल होणार आहे. राहुलच्या या प्रवासात मिरचाईबारी डीएस कॉलेजमार्गे लाभा येथील जाहीर सभेनंतर ते बंगालला रवाना होतील. बुधवारी त्यांनी कटिहार येथे पदयात्रा केली आणि लोकांना अभिवादन केलं.

भारत जोडो न्याय यात्रेत १४ राज्ये, ८५ जिल्ह्यांचा समावेश

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन २० मार्चला मुंबईत सांगता होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ महिन्यांआधीच ही यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. या काळात राहुल गांधी पायी आणि बसने ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. जनतेसमोर देशातील सद्य परिस्थिती मांडणार आहेत. जनतेच्या त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. मागच्याच आठवड्यात आसामध्ये सोनितपूर जिल्ह्यात जमावाने राहुल गांधींची बस अडवली होती आणि मोदी मोदीच्या घोषणा दिल्या होत्या. राहुल गांधी यांनीही आपल्या अंदाजात या जमावाला फ्लाईंग किस दिला. यावेळी राहुल गांधी बसमधून खाली उतरले होते. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना बसमध्ये बसवले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Erandol Vidhan Sabha : निवडणूक न लढविल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज; एरंडोल मतदारसंघातून ६० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा

Metastatic breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेले गैरसमज, काय आहे नेमकं तथ्य?

Hyderabad Tourist Places: हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा WTC Final मध्ये भिडणार? टीम इंडियाला करावं लागेल हे एकच काम

Devlali Vidhan Sabha : देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी; भूमिका स्पष्ट करण्याबाबत सरोज अहिरे यांची शिंदेंकडे विनंती

SCROLL FOR NEXT