Congress leader Amar Mehta dies after a fatal accident during stage setup ahead of Rahul Gandhi’s Dehradun event. saam tv
देश विदेश

राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; देशाच्या राजकारणात शोककळा

Congress Leader Dies During Stage Setup In Dehradun: देहरादूनमध्ये राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान काँग्रेस नेते अमर मेहता यांचा लोखंडी पाइप पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Omkar Sonawane

उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वी मोठा अपघात घडला असून कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान काँग्रेस नेते अमर मेहता यांचा मृत्यू झाला आहे. देहरादूनमधील बन्नू शाळेच्या ग्राऊंडवर 17 जुलै रोजी तरुणांचा आवाज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या तयारीत अमर मेहता व्यस्त होते. मंडप उभारत असताना लोखंडी पाइप त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले.त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारदारम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात स्टेज उभारत असताना घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघात का घडला याचा तपास सुरू करण्यात आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही घटनास्थळी पोहोचले आणि सदर परिस्थितीचा आढावा घेतला.

‘तरुणांचा आवाज हा कार्यक्रम सुरुवातील ग्राउंड येथे होणार होता. मात्र परवानगीच्या वादानंतर कार्यक्रमाचे ठिकाण बदलून बन्नू शाळेच्या मैदानावर करण्यात आले. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच झालेल्या या अपघातामुळे आयोजन आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, मंच उभारणीदरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी केली जात आहे. अपघातानंतर काही काळासाठी कार्यक्रमस्थळी बांधकामाचे कामही थांबवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Slipper Theft Myth : दुसऱ्याची चप्पल चोरल्याने घरी दारिद्र्य येतं? काय आहे सत्य?

Maharashtra News Live Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरातील पर्यटक मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपींना न्यायालयात हजर

Maharashtra Politics: पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रावादीकडून लॉबिंग सुरू; राजकीय हालचालींना वेग

Walnut Benefits: रोज सकाळी फक्त ३ अक्रोड खा; शरीर आणि मेंदू राहील निरोगी, मिळतील हे ७ फायदे

मृतदेह सापडला नाही तरी आरोपी दोषी ठरू शकतो; हत्येच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT