Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

Modi Surname Case: मोदी आडनाव प्रकरण! सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना नोटीस; १० दिवसात उत्तर द्यावे लागणार

Supreme Court On Modi Surname Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ते 2031 पर्यंत कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत.

Gangappa Pujari

Rahul Gandhi Defemation Case: मोदी आडनाव प्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर न्यायालयाने गुजरात सरकार आणि याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीवर दहा दिवसात उत्तर द्यावे लागणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातच्या सुरत न्यायालयाने या प्रकरणी राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुणावणी सुरू आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती पीके मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदी यांच्याकडून उत्तरे मागितली आहेत. पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 18 जुलै रोजी ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर आणि तातडीने सुनावणीची मागणी केल्यानंतर गांधींच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली होती.

तर राहुल गांधी 2031 पर्यंत निवडणूक लढवू शकणार नाहीत

येत्या काही दिवसांत राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ते 2031 पर्यंत कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत. वास्तविक, नियमांनुसार, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सहा वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या शिक्षेनंतर राहुल पुढील सहा वर्षे म्हणजे २०३१ पर्यंत निवडणूक लढवू शकणार नाहीत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT