RAHUL GANDHI CLAIMS SEARCH FOR PM MODI SUCCESSOR HAS BEGUN | SANJAY RAUT BIG STATEMENT saam tv
देश विदेश

पंतप्रधानांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू, काँग्रेस कमिटीच्या बैठकीत राहुल गांधीचा मोठा दावा

‘Search for PM Modi’s Successor Underway’: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय भविष्याबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केलाय... मोदी लवकरच पायउतार होणार असून पंतप्रधान पदासाठी उत्तराधिकाऱ्यांचा शोध सुरु झाल्याचं राहुल गांधी म्हणालेत...मात्र पंतप्रधानांचा उत्तराधिकारी कोण असेल? राऊतांनी भाजपवर काय टीका केलीय...पाहूयात या रिपोर्टमधून....

Suprim Maskar

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत देशाच्या राजकारणाबाबत अनेक महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वाटचालीबाबत एक मोठे विधान केलयं... मोदींचा राजकीय काळ आता शेवटच्या टप्प्यात आला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचा दावा राहुल गांधींनी या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...या बैठकीत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ऐका...

नरेंद्र मोदींचा राजकीय अंत जवळ आला असून त्यांची वेळ संपलीय...

मोदींचा सत्तेतील अंतिम टप्पा सुरु झाला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा शोध घेतला जातोय

केंद्र सरकार पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत आल्यानं काँग्रेस नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी

दुसरीकडे पंतप्रधान म्हणून मोदींचा हा शेवटचा वाढदिवस असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय....17 सप्टेंबरनंतर देशाच्या राजकारणात मोठे बदल होणार असल्याचे संकेतही राऊतांनी दिलेत... काँग्रेसनंही पंतप्रधानांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु असल्याचा दावा केलाय. मात्र 2029 पर्यंत पंतप्रधानपदाची ‘व्हॅकन्सी’ नाही, असं म्हणत भाजपनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलयं...

गेल्या काही महिन्यांपासून नीट पेपरफुटी, राम मंदिर दानचोरी, कुंभमेळ्यातील घोटाळा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकाराला घेरण्याची एकही संधी सोडली नाही... अशातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय भवितव्याबाबत वर्तवलेल्या भाकितामुळे एकच खळबळ उडालीय...त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी कोण याचीच आतापासून जोरदार चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT