Rahul Gandhi 
देश विदेश

मोदींच्या कार्यालयातून मला माहिती मिळते; चीनचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Rahul Gandhi Speech : चीन आणि गलवानच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “मोदींच्या कार्यालयातून मला माहिती मिळते” असा दावा करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला.

Bharat Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंह, अमित शाह, यांच्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. रचानात्मक कॉग्रेसच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधींनी चीनने भारताच्या जमिनीवर कशी बळकावली आहे. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्र राजनाथ सिंह गलवानमध्ये कसे अपयशी ठरलेत. अरुणाचल प्रदेश चीनने भारतीय लष्करला गस्ती घालण्यापासून रोखलं. त्याच पंतप्रधान मोदी आपल्या देशातील माध्यमांना त्या बातम्या प्रसारित करण्यापासून रोखलं. याची माहिती आपल्याला पंतप्रधान मोदीच्या कार्यालयातून मिळाली असल्याचा गौप्यस्फोट राहुल गांधींनी केला.

गलवानमध्ये चीनने भारताची जमीन बळकावली. मात्र सीमेवर काय स्थिती वेगळी असून देशाचे लष्कर प्रमुख स्वत: सांगतात की चीनने सीमेवर अतिक्रमण केलंय, पण दुसरीकडे पंतप्रधान ती गोष्ट नाकारतात. अरुणाचलमधील आमच्या गस्तीच्या भागात चीनने गस्त घालण्यापासून आपल्या सैनिकांना रोखलं. त्यांनी थोडक्यात असं सांगितलं की, "बघा, ते सगळं ठीक आहे. ही जमीन तुमचीच आहे हे मान्य, पण तुम्ही इथे गस्त घालू शकत नाही.

राजनाथ सिंह, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची अवस्था अगदी हतबल झाली आहे. ते सर्वजण ज्याअंतर्गत ज्या विविध प्रसारमाध्यमांच्या संपादकांना फोन करून अरुणाचलची बातमी तुमच्या वर्तमानपत्रांत प्रकाशित करू नका,असं सांगत आहेत. त्यामुळे देशाचं नुकसान होतंय. पंतप्रधान मोदींनी देशाला संपवण्याच काम केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, भारताच्या जमिनीवर चीननं एक इंचही बळकावली नाहीये. परंतु लष्करचे अधिकार सांगतात की, भारताच्या जमिनीवर कब्जा करण्यात आलाय. यामुळे चीनमध्ये आपल्या प्रती वेगळा मेसेज गेला. पंतप्रधान मोदींनी देशाला संपवण्याचं काम केलंय. त्यांनी परराष्ट्र धोरणाला हरताळ फासलंय. त्यांनी फक्त अदानी यांना पैसा कमवून देण्यासाठी धोरण अवलंब केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT