नीट पेपरफुटीचा मुद्दा, दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात तरुणांवर लाठीमार आदी मुद्द्यांसह अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेत सरकारला चहूबाजूने घेरणाऱ्या काँग्रेसने आता E-20 चा मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ई-२० चा मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याची घोषणा केली आहे.
दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है...असं म्हणत राहुल गांधी यांनी यात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. लोकांच्या खिशातून पैसे काढून घेतले जात आहेत. याविरोधात आता लवकरच मोहीम सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राहुल गांधींनी केलेल्या या घोषणेमुळं सरकारचं टेन्शन आणखी वाढणार असल्याचं मानलं जात आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. E-20 चा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण म्हणतो की दाल में काला है, लेकिन पूरी दाल ही काली हैं....असं राहुल म्हणाले. चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही हा मुद्दा उचलून धरणार आहोत. एक मोठी मोहीम सुरू करणार आहोत. कारण लोकांची कार खराब केली जात आहे, त्यांच्या दुचाकी खराब केल्या जात आहेत. खरे तर त्यांच्या खिशातून पैसे काढून घेतले जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून E-20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून सर्वसामान्य नागरिक सरकारवर टीका करत आहेत. आमची वाहने नादुरुस्त होत आहेत, असा दावा केला जात आहे. याबाबत अनेक जण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे कसे नुकसान करत आहे, याबाबत दावे केले जात आहे. दुसरीकडे वाहनांचे काहीही नुकसान होणार नाही, असा दावा सत्ताधारी गटातील राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. आता विरोधी पक्षांतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसनेच E-20 विरोधात देशपातळीवर मोठी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.