Haridwar police raid HMT Grand hotel Saam Tv News
देश विदेश

Hotel Racket: देहविक्रीचा भंडाफोड, २ सख्ख्या बहिणींना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं; परिसरात खळबळ

Hotel HMT Grand Raid: सिडकुल परिसरात पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेट उघड केले. दोन पंजाबच्या बहिणींंसह ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Bhagyashree Kamble

हरिद्वार येथील पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने सिडकुल परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी हॉटेल मालक, २ ग्राहक आणि पंजाबमधील २ सख्ख्या बहिणींसह ४ कॉल गर्ल्सना हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे. मात्र, सेक्स रॅकेटचा प्रमुख फरार झाला आहे. आरोपींविरोधात सिडकूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

एसपी सिटी पंकज गायरोला म्हणाले, 'महिला उपनिरीक्षक राखी रावत आणि हेड कॉन्स्टेबल राकेश यांच्या पथकाने सिडकूल पोलिसांसह हरिद्वार येथील डैन्सो चौकाजवळील हॉटेल एचएमटी ग्रँडवर छापा टाकला. विविध खोलींमध्ये छापा टाकण्यात आला. एका खोलीमध्ये पुरूष आणि महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळले. तसेच आक्षेपार्ह साहित्य देखील सापडले.

पोलिसांनी हॉटेल मालक तंजीत, ग्राहक दीपक आणि अर्जून या तिघांना ताब्यात घेतलं. तसेच चार महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अमृतसर पंजाबरमधील दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश होता. तर एक महिला दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान, या सेक्स रॅकेटचा मुख्य सुत्रधार नितीन नावाचा व्यक्ती फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू असून, आरोपींविरोधात अनैतिक देहविक्रीच्या तस्करीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मनोहर सिंह यांनी आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT