पोलीस स्टेशनच्या समोरच सुरु होते 'सेक्स रॅकेट'; असा केला भांडाफोड Saam TV
देश विदेश

पोलीस स्टेशनच्या समोरच सुरु होते 'सेक्स रॅकेट'; असा केला भांडाफोड

चौकशी केली असता, यासाठी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची किंमत आकारण्यात आल्याचे आढळून आले.

वृत्तसंस्था

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गुन्हे शाखेने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यासमोरील गेस्ट हाऊसमध्येच हे सेक्स रॅकेटचा सुरु होते आणि त्याचाच पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी गेस्ट मॅनेजरसह चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ग्वाल्हेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, पडाव पोलीस ठाण्यासमोरील पाठक गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गुन्हे शाखेने साध्या वेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याला ग्राहक म्हणून गेस्ट हाऊसमध्ये पाठवले आणि मुलीच्या मागणीनुसार मॅनेजरने त्याला अनेक मुलींचे फोटो दाखवले. चौकशी केली असता, यासाठी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची किंमत आकारण्यात आल्याचे आढळून आले. सर्व काही सुरळीत होताच पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या अधिकाऱ्यांना इशारा केला आणि गेस्ट हाऊसवर छापे टाकण्यास सुरुवात झाली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकासह चार मुलींना घटनास्थळावरून पकडण्यात आले आहे. छापा टाकल्यानंतर हॉटेल मालक फरार झाला आहे.

गेस्ट हाऊसचा मालक वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतील अर्धी रक्कम स्वत:कडे ठेवायचा आणि उर्वरित रक्कम मुली आणि त्यांच्या दलालांना देत असे, असे तपासात समोर आले आहे. गेस्ट हाऊसच्या खोल्यांमधून अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक आणि अटक करण्यात आलेल्या मुलींची चौकशी सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT