Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : पठ्ठ्यानं कहरच केला; परीक्षेत लग्न म्हणजे काय? प्रश्नावर दिलं अतरंगी उत्तर; पेपर वाचून पोट दूखेपर्यंत हसाल

त्याला १० पैकी फक्त ० मार्क दिले आहेत. त्यामुळे सोशल स्टडिज या विषयाचा हा पेपर आहे.

Ruchika Jadhav

What is a Marriage : शालेय जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यात विविध रंग भरते. शाळा आणि तेथील मजामस्तीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. शाळेत परीक्षेच्यावेळी काही मुलं प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी देखील पेपरमध्ये गाणी लिहून तो पेपर पूर्ण करतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका निबंधाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलाने लग्न या विषयावर लिहिलेला निबंध वाचून तुम्ही देखील पोट दुखेपर्यंत हसाल. (Exam Paper)

सोशल मीडियावर एका मुलाने लग्न म्हणजे काय आहे? या प्रश्नावर मोठा निबंध लिहिला आहे. त्याने लिहिलेल्या निबंधाचा फोटो काढून तो फोटो @srpdaa या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. या निबंधामध्ये मुलाने लग्नाची त्याच्या मनात असलेली संकल्पना कागदावर उतरवली आहे. शिक्षिकेने या तरुणाचा पेपर तपासून लाल पेनाने त्यावर काट मारली आहे. तसेच त्याला १० पैकी फक्त ० मार्क दिले आहेत. सोशल स्टडिज या विषयाचा हा पेपर आहे. यावर शिक्षिकेने नॉनसेन्स असं देखील लिहिलं आहे.

मुलाने आपल्या निबंधात असं लिहिलंय तरी काय?

लग्न कधी होतं? यावर विद्यार्थ्यांने लिहिलं आहे की, लग्न तेव्हाच होतं जेव्हा एका मुलीचे आई बाबा तिला संभाळण्यासाठी तयार नसतात. ते मुलीला सांगतात की, आता तू मोठी झाली आहे. त्यामुळे आता आम्ही जास्त दिवस तुला संभाळू नाही शकत. तू आता तुझं पोट भरण्यासाठी वेगळा पर्याय शोध. तुला संभाळण्यासाठी आणि दोन वेळचे जेवन खाऊ घालण्यासाठी तुझ्याकडे एक पुरुष असायला हवा, मुलीसाठी असं कारण या विद्यार्थ्याने लिहिलं आहे.

तर मुलासाठी कारण लिहित त्याने निबंधाच्या पुढील भागात लिहिले आहे की, मुलाच्या घरचे देखील त्याला लग्नासाठी फोर्स करत असतात. तू आता मोठा झाला आहे. त्यामुळे लवकरच तुझं लग्न होणं गरजेचं आहे. असं या मुलाने निबंधात लिहिलंय. आता पुढे हा पठ्ठ्या निबंधात लिहितो की, दोघांच्या घरामध्ये अशा प्रकारचे वातावरण असल्याने एक दिवस ही मुलगी मुलाला भेटते. ते दोघे एकमेकांना आपल्या अडचणी सांगतात. त्यावेळी आपल्या अडचणी सारख्याच आहेत असे समजताच दोघेही एकमेकांशी लग्नगाठ बांधतात.

या विद्यार्थ्याचा निबंध वाचून सर्वजण सून्न झाले आहेत. तसेच यावर विविध कमेंट येत आहेत. काही व्यक्तीने यावर म्हटलं आहे की, या मुलाला सुवर्ण पदक दिले पाहिजे. तर एकाने त्याच्या बुद्धीचं विशेष कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शरद पवारांच्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT