QUAD बैठकीत तालिबानी सरकारवर विचारमंथन...
QUAD बैठकीत तालिबानी सरकारवर विचारमंथन... Twitter/@narendramodi
देश विदेश

QUAD बैठकीत तालिबानी सरकारवर विचारमंथन...

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका च्या दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन Joe Biden यांच्यात शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये पहिली द्विपक्षीय बैठक पार पडली. मोदी-बायडन यांच्या भेटीनंतर अमेरिकेत क्वाड देशांची बैठक झाली. या बैठकीत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचे नेते सहभागी होते. तर भारत देशाकडून क्वाडच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. QUAD बैठकी दरम्यान, अफगाणिस्तान आणि तेथील तालिबान सरकार या विषयी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान चार देशांनी सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकीत तालिबान संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

भविष्यातील उद्दिष्टे निश्चित;

अफगाणिस्तानशी संबंधित अनेक मुद्द्यांवर मते दिली गेली आहेत. आणि भविष्यातील उद्दिष्टेही निश्चित करण्यात आली आहेत. तालिबान व्यतिरिक्त चीनच्या विरोधात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपाननेही  कठोर भूमिका घेतलेली दिसत आहे. या बैठकीत इंडो पॅसिफिक  क्षेत्राचा उल्लेख करत जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी  चीनला घेरण्याचा प्रयत्न  केला.

QUAD बैठकीत चीनी अॅप्सवर पंतप्रधान मोदींची कठोर भूमिका;

QUAD बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनी अॅप्सचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी 'क्लीन अॅप मूव्हमेंट'ला धार देण्यावर भर दिला आहे. त्याच्या या उपक्रमाचे QUAD च्या इतर देशांनी स्वागत केले आहे. मोदींनी सांगितले कि , भारताने अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काहींवर बंदी घालण्यात आली आहे तर काहींना गोपनीयतेचे उल्लंघन केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाला सामोरे जाण्यासाठी क्वाड पुन्हा सक्रिय: पंतप्रधान मोदी;

आपल्या भाषणात या क्वाडचा हेतू स्पष्ट करताना पीएम मोदी म्हणाले की, 2004 मध्ये क्वाड देश त्सुनामीला सामोरे जाण्यासाठी एकत्र आले होते. त्याचबरोबर, आता कोरोनाशी लढणाऱ्या जगाच्या भल्यासाठी क्वाड पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT