Pushpa Style Raid Saam Tv News
देश विदेश

Pushpa 2 Style Raid: एकदम पुष्पा २ स्टाईल, पोलिसांनी मालवाहू वाहनात लपून छापा टाकला, पुढे काय झालं?

Pushpa 2 Style Raid News: मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमध्ये पोलिसांनी पु्ष्पा २ फिल्मी स्टाइलमध्ये छापा टाकत अवैध शस्त्रांच्या कारखान्यावर छापा टाकला. तसेच आरोपींना अटक केलं आहे.

Bhagyashree Kamble

मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमध्ये पोलिसांनी पु्ष्पा २ फिल्मी स्टाइलमध्ये छापा टाकत अवैध शस्त्रांच्या कारखान्यावर छापा टाकला. पोलिसांनी बेकायदा कारखान्यावर छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि हत्यारे बनवण्याची साधने जप्त केली आहेत.

मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमध्ये पोलिसांनी पुष्पा २ फिल्मी स्टाईलमध्ये मोठ्या अवैध कारखान्याचा पर्दाफाश केला. कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलं असून, आरोपींकडून हत्यारे आणि हत्यारे बनवण्याची साधनं जप्त केली आहेत. ग्रामीण भागातील शाळेजवळ सुरू असलेल्या या बेकायदेशीर शस्त्र कारखान्यावर छापा टाकण्यासाठी, २१ पोलीस कर्मचारी मालवाहू वाहनातून जात ही कारवाई केलीय.

पुष्पा २ स्टाईल सापळा रचत चोरट्यांचा पर्दाफाश

अवैध शस्त्रांची निमिर्ती होत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. पचौरी गावातील शाळेजवळ एका झोपडीत अवैध शस्त्रांचा कारखाना सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून खाकनर टीआय यांच्या पथकातील २१ पोलीस कर्मचारी मालवाहू वाहनात लपून गावात पोहोचले. नंतर अवैध शस्त्रांच्या कारखान्यावर छापा टाकला.

या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलं असून, आणखीन एका अल्पवयीन आरोपीला अटक केलं आहे. अल्पवयीन मुलगा अवैध शस्त्र तयार करण्यात आरोपींना मदत करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ८ अवैध बनावट पिस्तूल, ६ अर्ध तयार पिस्तूल, ५ पिस्तुलांचे साचे, ९ मॅगझीन, ३ मॅगझीन मोल्ड आणि शस्त्रे बनवण्याची साधने जप्त केली आहेत. पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम २५(१-बी)(अ), २५ (१-अ), कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT