Jagannath Rath Yatra जग्गनाथपुरी यात्रा चेंगराचेंगरीने घेतला आणखी १ बळी,मृतांची संख्या ४ वर;१०० हून अधिक भाविक रूग्णालयात दाखल meta ai
देश विदेश

Jagannath Rath Yatra : जग्गनाथपुरी यात्रा चेंगराचेंगरीने घेतला आणखी १ बळी, मृतांची संख्या ४ वर; १०० हून अधिक भाविक रूग्णालयात दाखल

Jagannath Rath Yatra : जगन्नाथपुरी रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दी आणि उकाड्यामुळे आणखी एका ५७ वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृतांची संख्या आता ४ वर पोहोचली असून १०० हून अधिक भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Saam Tv

ओडिशामधील जगन्नाथपुरीच्या यात्रेत गुदमरून अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवाच्या एका भेटीसाठी भाविकांचा प्रचंड मोठा मेळा जग्गनाथपुरीच्या यात्रेत जमला होता.ज्यात हजारोंच्या संख्येने लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता सुभद्रा देवीचा रथ ओढताना आणखी एका भाविकाचा मृत्यू झाला असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ओडिशाच्या जगन्नाथपुर यात्रा ही सर्वात प्रसिद्ध यात्रांपैकी एक आहे . हा रथोत्सव जवळपास १० ते ११ दिवस चालतो. मुख्य मंदिरापासून साधारण ३ किमी पर्यंत हा रथ ओढला जातो. त्यामुळे लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होत असतात. परंतु यावर्षी प्रचंड गर्दी झाली असून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेदरम्यान आतापर्यंत तीन लोकांचा मृ्त्यू झाला असून , आता सुभद्रा देवीचा रथ ओढताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धर्मशाला येथे देवीचा रथ ओढत असताना अचानक एक व्यक्ती कोसळला. त्याला तत्काळ पुरीच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ५७ वर्षीय अभिराम दास यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता .यात्रेदरम्यानची गर्दी आणि गरमी यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला आणि गुदमरल्याने त्यांना चक्कर आली. आतापर्यंत या यात्रेदरम्यान चार लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक भाविक जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत.

प्रशासनाने या घटनेची जबाबदारी उचलली आहे. प्रचंड गर्दी आणि अति गरमीमुळे अनेक भाविकांचे जीव धोक्यात आले होते. यात्रेत जीव गमावलेल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रूपयांची मदत करणार असल्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण यांनी केली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT