Punjab Chandigarh Minister Laljit Bhullar News Saam Tv
देश विदेश

Punjab : परिवहन मंत्र्यांचा अचानक राजीनामा ; राजकीय वर्तुळात खळबळ

Punjab Chandigarh Minister Laljit Bhullar News : पंजाबचे परिवहन मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर अधिकाऱ्याच्या आत्महत्येचा आरोप असल्याने त्याबाबत चौकशी सुरु आहे. या वादामुळे विरोधी पक्षाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • पंजाबमध्ये मंत्री भुल्लरांचा राजीनामा

  • आत्महत्येच्या प्रकरणामुळे वाद निर्माण

  • छळाच्या आरोपांमुळे दबाव वाढला

  • मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा स्वीकारला

चंदीगडच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका अधिकाऱ्याच्या आत्महत्येवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबचे परिवहन मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांनी शनिवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका अधिकाऱ्याने भुल्लर यांच्यावर छळाचा आरोप केला होता, याप्रकरणी चौकशी सुरु असून भुल्लर यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती.

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमृतसर येथे कार्यरत असलेले पीडब्ल्यूसीचे जिल्हा व्यवस्थापक गगनदीप रंधावा यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, त्यांनी भुल्लर यांच्या भीतीने हे पाऊल उचलल्याचा दावा केल्याचे आणि आपण वाचणार नाही असे म्हटले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला, ज्यामुळे विरोधी पक्षांनी तात्काळ कारवाईची मागणी केली. काँग्रेसने भुल्लर यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आणि त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

त्यानंतर शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भुल्लर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि मंत्रिमंडळातून त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यांनी मुख्य सचिव के.ए.पी. सिन्हा यांना आरोपांची चौकशी करण्याचे निर्देशही दिले. भुल्लर यांच्या राजीनाम्यानंतर चंदिगढच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी

370 Biryani Controversy: 'व्यक्ती बदलतात, वाद बदलतात, पण प्रेक्षक...'; 370 बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरनं नेटकऱ्यांना सुनावलं

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल; पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

मुख्याध्यापकानं आधी दोन मुलं,पत्नीला मारलं नंतर स्वतः केली आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

Smriti Irani : मतदार यादीतून स्मृती इराणींचं नाव गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT