Police Transfer News  AI Image
देश विदेश

Transfer News : पोलीस दलात मोठे फेरबदल! तब्बल २७३ DSP आणि एका IPS अधिकाऱ्याची बदली, कुणाची कुठे झाली नियुक्ती

Punjab Police Transfer Update News : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फेरबदल करण्यात आला आहे. 273 DSP आणि एका IPS अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पंजाब पोलिसांनी 273 उपअधीक्षक (DSP) आणि एका IPS अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी हे आदेश काढण्यात आले असून, सर्व अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंजाब पोलीस मुख्यालयातील सीक्रेट सेक्शन-2 कडून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला आहे. या बदली प्रक्रियेत अमृतसर, लुधियाना, जालंधर, पटियाला, बठिंडा, मोगा, संगरूर, फाजिल्का आणि SAS नगर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर, तर काहींना गुन्हे शाखा, सायबर क्राइम, गुप्तचर विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथकात नियुक्त करण्यात आले आहे.

या फेरबदलात 2024 च्या बॅचचे IPS अधिकारी पारस गर्ग यांचाही समावेश आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीत (NPA) मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची अमृतसर येथे ASP SD सेंट्रल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, अमरबीर सिंह यांची जालंधर येथून SAS नगर येथे सायबर क्राइम आणि फॉरेन्सिक विभागाच्या DSP पदावर बदली करण्यात आली आहे. तर गोल्डी विरदी यांना रोपड रेंजमध्ये DSP ANTF म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर नवीन ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या विभागांमध्येही बदल करण्यात आले आहेत. लुधियाना येथे वाहतूक आणि गुन्हे शाखेत, तर अमृतसरमध्ये सुरक्षा आणि विशेष गुन्हे विभागात नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 22 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारपर्यंत नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: भारताने न्यूझीलंडला विजयासाठी दिलं मोठं आव्हान, २३३ धावांची आघाडी; शेवटच्या दिवशी किवींचं काय होणार?

धुळ्यावर शोककळा! देवदर्शनावरून परतताना पवार कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

Gajar Halwa Recipe : हिवाळ्यात गाजरांपासून बनवा चमचमीत हलवा; चव इतकी अप्रतिम की पुन्हा पुन्हा खाल!

Maharashtra News Live Update: बारामतीत काल सायंकाळी उद्योजकाच्या वाहनावर झाला होता गोळीबार

BJP OBC Morcha : भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातील चौघांना संधी

SCROLL FOR NEXT