Terrorist Pannun  Saam Digital
देश विदेश

Punjab Crime: अयोध्या परिसरात घातपात करण्याचा कट, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी; खलिस्तानी दहशतवादी पन्नूविरोधात गुन्हा

Vishal Gangurde

Gurpatwant Singh Pannun Latest News:

पंजाबमध्ये बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसच्या गुरपतवंत सिंह पन्नू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतसरमधील सुल्तानविंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने पन्नूला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. याच पन्नूने १६ जानेवारीला सोशल मीडियावरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी दिली होती. तसेच अयोध्येत घातपाताचा कट रचल्याचेही समोर आलं आहे. (Latest Marathi News)

'आज तक'च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर एक पोस्ट करत एका व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंह पन्नूने दावा केला होता की, अमृतसरमधील दुर्गियाना मंदिर महत्वाचं नाही. तसेच खलिस्तान समर्थक नेत्याने म्हटलं की, मंदिर प्रशासनाला मंदिर बंद करून चावी स्वर्ण मंदिराला द्या, असा इशारा दिला.

पंजाब पोलिसांनी सोशल मीडियाच्या आधारावरून पन्नूच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरपतवंत सिंह पन्नूने १६ जानेवारीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पोलीस अधिकारी गौरव यादव यांना धमकी दिली होती. तसेच त्याने पंजाबच्या गुंडांना त्याच्याशी संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच त्याने २६ जानेवारीला पंजाबमधील वातावरण खराब करण्याची धमकी दिली होती.

अयोध्येत घातपात करण्याची धमकी

अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी पन्नूच्या सांगण्यावरून घातपात करण्याच्या विचारात असलेल्या तीन संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी शंकर लाल दुसाद याचा थेट पन्नूच्या संपर्क होता. कॅनडात मारला गेलला सुखदूल सिंह याचाही पन्नूशी संपर्क होता.

२००३ मध्ये सुक्खा याची हत्या झाल्यानंतर आरोपी शंकर लखविंदर सिंह लांडा हा पन्नूच्या संपर्कात आला होता. पन्नूच्या फोननंतर त्याने अयोध्या परिसरात रेकी केली होती. अयोध्येला पोहोचल्यानंतर शंकर फोनवरून संपर्कात राहून माहिती देत होता. हरियाणा पोलिसांना चकमा देण्यासाठी तिघे जण कारवर झेंडा लावून रेकी करत होते. काही जणांकडे आधारकार्डही बनावट होतं. यूपी पोलिसांना या तीन संशयितांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर या तिघांना अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

SCROLL FOR NEXT