Nagpur News: शेतात काम करताना वीज कोसळली; मायलेकासह तिघांचा मृत्यू

Mother And Son Died In Nagpur: नागपूरमधील धापेवाडा गावात एक धक्कादायक घटना घडलीय. शेतावर वीज कोसळल्याने आई, तिचा १८ वर्षांचा मुलगा आणि एका मजुराचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
Mother And Son Died In Nagpur
Lightning strike tragedy: Mother, son, and laborer die while working in a Nagpur farm.Saamtv
Published On

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील काही भागात दुपारी विजांचा कडकडाटसह पाऊस झाला. या पावसाने तीनजणांचा बळी घेतलाय. शेतात काम करत असताना वीज कोसळून मायलेकासह मजुराचा मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील धापेवाडा येथे ही घटना घडलीय. ओमप्रकाश पाटील वय 18 वर्षीय तर वंदना प्रकाश पाटील असं मायलेकाचे नाव आहे. पोलिसानी घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाससाठी पाठवले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत शोक व्यक्त केलाय. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु. शिवारात दुपारी वीज पडून आई, मुलगा आणि शेतात काम करणाऱ्या एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

वीज कोसळून चुलत भावांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे एक दिवसापूर्वी वीज कोसळल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता. पाऊस आल्यानंतर शेतीतील पेरणीच्या कामाला वेग येत असतो. त्यामुळे घाडगे गावातील रितेश मोरेश्वर सरोदे (वय २८) व राजू ताराचंद सरोदे (वय १६) हे दोन भाऊ शेतात पेरणीच्या कामाला गेले होते. त्यावेळी वीज कोसळली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com