Bhagwant Mann - Saam Tv
देश विदेश

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय...आमदारांना आता एकच पेन्शन मिळणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये घट करण्यात आली आहे.

साम वृत्तसंथा

पंजाबचे (Panjab) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये घट करण्यात आली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी धडाडीचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या भत्तेमध्ये वाढ केली आहे. तर पंजाबमध्ये माजी मंत्र्यांच्या पेन्शनमध्ये घट केली आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक होत आहे.

पंजाबमध्ये (Panjab) आमदारांना एकच पेन्शन मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagavant Mann) यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत आमदारांच्या पेन्शन फॉर्म्युल्यात बदल होणार आहे. एखादा व्यक्ती कितीवेळा आमदार झाला, यावरुन त्या आमदाराचे पेन्शन निश्चित होते, अशा पध्दतीने पंजाबमध्ये आतापर्यंत पेन्शन मिळत होती. पण आता एखादी व्यक्ती कितीही वेळा आमदार झाली, तरी त्याला पेन्शन (Pension) एकदाच मिळणार आहे.

पंजाब (Panjab) विधानसभेच्या निवडणुकीत (Election) आम आदमी (AAP) पक्षाने मोठा विजय मिळवल्यानंतर मान यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर मान यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची भेट घेतली. राज्याच्या बिकट आर्थिक स्थितीचा दाखला देत त्यांनी पंजाबसाठी पंतप्रधान मोदींकडे एक लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली होती. पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंजाबला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय सुरक्षेसाठी पंजाब सरकारला सहकार्य करण्याची विनंतीही केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT