Punjab Road Accident Saam Tv
देश विदेश

Punjab Road Accident : देवदर्शनाची इच्छा अपूर्ण राहिली; भरधाव ट्रकनं 8 भाविकांना चिरडलं

Shivani Tichkule

Chandigarh Accident News : पंजाबमधील गडशंकर येथे काल रात्री उशिरा झालेल्या एका रस्ता अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा सुमारे 50 भाविक बैसाखी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चरण छो गंगेच्या दिशेने चालले होते.

दरम्यान, यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाच भाविक एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील आहेत.

अपघातानंतर (Accident) ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे बुधवारीच पंजाबमधील गडशंकर भागातील गढ़ी मानोस्वालजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. गडशंकर उपविभागातील श्री खुरालगड साहिब येथे बैसाखीनिमित्त लंगरचे आयोजन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. (Road Accident News)

गंधाशंकरच्या रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरुस्ती झालेली नाही. एक तर रस्त्याची अवस्था बिकट आहे आणि दुसरे म्हणजे रस्त्यावरील तीव्र वळणे आणि चढ-उतार यामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि वाहने पलटी होतात, असे लोकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे बैसाखी सणानिमित्त पंजाबच्या (Punjab) विविध भागांत मंडळांचे आयोजन केले जात असून लंगरची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे मुख्य गुरुद्वारांकडे जाणाऱ्या भाविकांची पंजाबच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

Shirdi Saibaba : साई चरणी ६८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्रोच अर्पण

SCROLL FOR NEXT