Punjab Elections Saam Tv
देश विदेश

Punjab Elections: प्रामाणिक व्यक्तीला कोणीही थांबवू शकत नाही, नवज्योतसिंग सिद्धुंच्या मुलीची विरोधकांवर जोरदार टीका

नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना पंजाब निवडणुकीसाठी त्यांच्या कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.

वृत्तसंस्था

पंजाब: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना पंजाब निवडणुकीसाठी त्यांच्या कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सिद्धूची मुलगी राबिया पंजाबमध्ये इतर पक्षांवर शाब्दिक हल्ला करत आहे. हायकमांडची मजबुरी असावी, पण प्रामाणिक माणसाला कोणीही रोखू शकत नाही. बेईमान थांबले पाहिजे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली (Punjab elections Navjot Singh Sidhus daughter criticize opposition and says maybe high command had some compulsion).

यापूर्वी, राबियाने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची खिल्ली उडवली आणि म्हटले की, ज्याच्या खात्यात 133 कोटींहून अधिक रुपये आहेत, ते गरीब नाही. चन्नीजी गरीब नाहीत. ते करोडपती गरीब आहेत. त्या म्हणाली की सिद्धू पंजाबसाठी जगतात आणि त्यांना पुढे येऊ दिले जात नाहीये.

नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही याबद्दल बोलले. आम्ही चरणजीत सिंह चन्नी यांच्यापेक्षा गरीब आहोत, त्यांचे घर पहा, आमचे घर पहा, असं त्या म्हणाल्या. दुसरीकडे वडिलांसाठी प्रचार करणाऱ्या राबिया सिद्धूने एक अत्यंत भावनिक वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, जोपर्यंत वडील निवडणूक जिंकत नाहीत, तोपर्यंत मी लग्न करणार नाही.

माझे वडील ड्रग्ज विक्रेत्याशी स्पर्धा करत आहेत - राबिया

राबियाने सांगितले की, तिचे वडील निवडणुकीच्या रिंगणात ड्रग्ज (Drugs) विक्रेत्याशी स्पर्धा करत आहेत. तुमच्या मुलांना ड्रग्जच्या आहारी जायचे असेल तर बिक्रम मजिठियाची निवड करा, असं त्या म्हणाल्या. त्यांनी आपल्या वडिलांची निष्कलंक प्रतिमा असलेले नेते म्हणून वर्णन केले आणि म्हटले की जर त्यांना काँग्रेस (Congress) हायकमांडने मुख्यमंत्री चेहरा बनवले नाही तर कदाचित त्यांची काही मजबुरी असावी.

सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते

दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'तुम्हाला 60 आमदार मिळतील की नाही, हे पंजाबचे लोक ठरवतील. 60 आमदार जिंकून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की राजकारणात काहीही ठरवले जात नाही. नवज्योतसिंग सिद्धू पुढे म्हणाले, 'जर 60 आमदार जिंकले तर आमचा मुख्यमंत्री होईल, पण तसे झाले नाही तर दुसरे कोणीतरी सरकार बनवेल, किंवा कोणाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल याबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही".

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT