Punjab Elections: मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यातली दरी मिटेना - Saam TV
देश विदेश

Punjab Elections: मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यातली दरी मिटेना

पंजाब विधानसभेच्या मतदानासाठी चार-पाच दिवस शिल्लक असताना काँग्रेस अंतर्गत मतभेद मात्र कायम आहे

साम टिव्ही

चंडीगड : पंजाब विधानसभेच्या मतदानासाठी चार-पाच दिवस शिल्लक असताना काँग्रेस अंतर्गत मतभेद मात्र कायम आहेत. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी व प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील दुरावा कायम आहे. परिणामी दोघेही एकमेकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्याचा फटका काँग्रेस (Congress) पक्षाला बसण्याची शक्यता आहे. (Punjab Elections clear rift in Punjab Cm and Navjot Siddhu)

चन्नी व सिद्धू या दोघांनीही एकमेकांच्या मतदार संघांकडे पाठ फिरवली आहे. रविवारी (ता. १३) धुरी येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभेत बोलण्यास सिद्धू यांनी नकार देत चन्नी यांच्याकडे बोट दाखवत त्यांना बोलायला सांगा असे सुचवले.

मुख्यमंत्री चन्नी हे दोन विधानसभा मतदार संघातून लढत आहेत. याशिवाय त्यांच्याकडून पंजाबसह उत्तरप्रदेशच्या ‘स्टार प्रचारक’ म्हणून जबाबदारी आहे. पण त्यांच्या विरोधात आपने दोन्हीही मतदार संघात आव्हान उभे केल्याने त्यांना मतदार संघ सोडणे मुश्किल झाले आहे.

त्यातच चन्नी यांचे नांव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केल्यानंतर सिद्धू नाराज आहेत. मुख्यमंत्री व्हायला ६० आमदार निवडून यावे लागतात असे सांगत त्यांनी ही नाराजी उघड व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलीनेही चन्नी यांच्यावर आरोप केले आहेत. त्यातून नाराज असलेल्या चन्नी यांनी सिद्धू यांच्या मतदार संघात जाण्याचे टाळल्याचे बोलले जाते.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT