Punjab Law College Firing News Saam Tv
देश विदेश

Crime News : विद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीची भर वर्गात गोळ्या झाडून केली हत्या, लॉ कॉलेजमधील धक्कादायक घटना

Punjab Law College Firing News : पंजाबमधील लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने वर्गातच विद्यार्थिनीवर गोळीबार केला. या घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Alisha Khedekar

  • पंजाबच्या लॉ कॉलेजमध्ये वर्गातच गोळीबार

  • विद्यार्थिनी संदीप कौरचा जागीच मृत्यू

  • आरोपी विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला

  • कॉलेज कॅम्पस सील; पोलिसांचा तपास सुरू

पंजाबमधील लॉ कॉलजेमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीवर क्लासरुममध्ये गोळ्या झाडल्या त्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात देखील गोळ्या झाडल्या. या गोळीबारात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याची प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव संदीप कौर असे आहे तर आरोपी विद्यार्थ्याचे नाव प्रिन्स राज असे आहे. हे दोघेही पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यातील माई भागो लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होते. दरम्यान आज सकाळच्या सुमारास लेक्चर सुरु होण्याच्या काही तास आधी कॉलेजच्या एका वर्गात प्रिन्स राजने संदीप कौर या विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या केली.

धक्कादायक म्हणजे प्रिन्सने वर्गमैत्रीणीची हत्या केल्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत संदीप कौर हीचा मृत्यू झाला असून प्रिन्स राजनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घडलेली घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी संपूर्ण लॉ कॉलेज कॅम्पस सील केला आहे, कोणालाही आत येण्यास मनाई केली आहे. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक अंदाजात प्रेम प्रकरणातून ही हत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर कॉलेज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Success Story: जिद्द! IAS होण्यासाठी परदेशातील नोकरी धुडकावली; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार

Milk Benefits For Skin: उन्हाळ्यात काळी त्वचा होईल पांढरीफटक, फक्त या ३ पद्धतीने लावा कच्चे दूध

थलपती विजयच्या विजयाचं रहस्य काय? 2 वर्षांत TVK कशी झाली कॅडरबेस पार्टी?

SCROLL FOR NEXT