Santokh Singh Chaudhary Saam Tv
देश विदेश

Santokh Singh Chaudhary : भारत जोडो यात्रेत चालताना अचानक खाली कोसळले; काँग्रेस खासदाराचं निधन

पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन

वृत्तसंस्था

Santokh Singh Chaudhary Passed Away : पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन झाले आहे. चौधरी हे शनिवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेत चालत असताना अचानक ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित केले.

चौधरी यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा स्थगित केली आहे. काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले आहेत.

संतोख सिंग चौधरी यांच्या निधनाने पंजाबसह देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुल गांधीसोबत पदयात्रेत चालत असताना संतोख सिंह यांना ह्रदयविकाचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काही वेळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.  फिल्लौरच्या भटियानमधील प्रभज्योतसिंग यांच्या घराबाहेर ही यात्रा सद्या थांबविण्यात आली असून राहुल गांधी चौधरी संतोख सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. संतोख सिंह हे ७६ वर्षांचे होते, त्यांच्या निधनामुळं अनेक पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Suraj Chavan New House: गुलीगत स्टारचं अलिशान घर, डोळे दिपवणारं इंटेरिअर

Maharashtra Live News Update: बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुछ तो बडा होने वाला है'; अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची ५० मिनिटे चर्चा

SCROLL FOR NEXT