भगवंत मान Saam Tv
देश विदेश

पंजाब: मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा! 23 मार्चपासून सुरू होणार भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन

पंजाबचे मुखमंत्री भगवंत मान यांनी पंजाब राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुखमंत्री मान यांनी सांगितले की, 23 मार्च शाहिद दिवस (Shaheed Diwas) रोजी एक अँटी करप्शन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात येत आहे.

वृत्तसंस्था

पंजाब: पंजाबचे मुखमंत्री भगवंत मान यांनी पंजाब राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुखमंत्री मान यांनी सांगितले की, 23 मार्च शाहिद दिवस (Shaheed Diwas) रोजी एक अँटी करप्शन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात येत आहे. त्यांनी सांगितलं लोक येथे व्हाट्सअप नम्बरवरून आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. यावेळी बोलताना मान म्हणाले, 23 मार्च शाहिद दिवस दिवशी मी एक हेल्पलाईन नंबर सुरु करत आहे, जो माझा वैयक्तिक व्हाट्सअ‍ॅप नंबर असेल. पंजाबमध्ये, जर तुम्हाला कोणी लाच मागितली तर नकार देऊ नका, व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्या नंबरवर पाठवा. "माझे कार्यालय या प्रकरणाची चौकशी करेल आणि कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही," असे ते म्हणाले.

भगवंत मान यांनी काही तासांपूर्वी राज्याच्या हिताचा मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, हे असे पाऊल असेल, जे पंजाबच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणीही उचलले असेल. अशा परिस्थितीत तो काही मोठा निर्णय घेऊ शकतो, असा विश्वास होता. दिल्लीप्रमाणेच पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (AAP) सरकारही भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

मान यांच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

त्याचवेळी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्याच्या घोषणेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, जेव्हा कोणी तुमच्याकडे लाच मागते तेव्हा देऊ नका, उलट संभाषण रेकॉर्ड करा आणि व्हिडिओ/ऑडिओ पाठवा. व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठवा. ते म्हणाले की, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, तातडीने कठोर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचार हा अजूनही मोठा मुद्दा आहे आणि निवडणूक प्रचारादरम्यान 'आप'ने याला आळा घालण्याचे आश्वासन दिले होते. पंजाबसह देशाच्या विविध भागात अनेक वेळा कोणत्याही कामासाठी लोकांकडून लाच मागितली जाते. त्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT