Punjab MLA Harmit Singh Pathanmajra arrested by police near Shivpuri in Madhya Pradesh after months on the run. Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! फरार सत्ताधारी आमदाराच्या आवळल्या मुसक्या; अत्याचार प्रकरणी पोलिसांची थेट दुसऱ्या राज्यात घुसून कारवाई

Punjab AAP MLA Harmit Singh Pathanmajra Rape Case Arrest Details: पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंह पठाणमाजरा यांना बलात्कार प्रकरणात मध्यप्रदेशातील शिवपुरी येथून अटक करण्यात आली.

Omkar Sonawane

पंजाब राज्यातील आमदार हरमित सिंह पठानमाजराला मध्यप्रदेशमध्ये अटक केली आहे. तो मागच्या 7 महिन्यांपासून फरार होता. बलात्कार प्रकरणात पोलीस त्याच्या मागावर होती. एका महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषण, धमकी आणि अश्लील मेसेज पाठवत असल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर करत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंह हा गायब होता. बुधवारी त्याला मध्यप्रदेशच्या शिवपुरीमधून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी पठानमाजराला एका गाडीमध्ये पकडले आणि पंजाबला घेऊन गेले.

हरमीतसिंह पठानमाजरा सनौरचा आमदार आहेत. तो आम आदमी पक्षातून पहिल्यांदा आमदार झाला. पठानमाजराच्या विरोधात मागच्या वर्षी 1सप्टेंबरला बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो फरार झाला. पंजाब पोलीस त्याला अटक करण्यासाठी हरियाणा आणि करनाल या ठिकाणी गेली असता त्याच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या होत्या.

आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा मध्य प्रदेशात असल्याची माहिती पटियाला पोलिसांना मिळाली. तो त्याच्या काही साथीदारांसह कारमधून कुठेतरी जात होता. माहिती मिळताच पटियाला पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी आमदार हरमीत सिंग पठाणमाजराला शिवपुरीजवळून अटक केली. दोन वर्षांपूर्वीच्या एका बलात्कार प्रकरणात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या आमदाराच्या पटियाला पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

आमदार हरमीत पठाणमाजराला ग्वाल्हेर-शिवपुरी बायपासवरून अटक करण्यात आली. तो त्याच्या समर्थकांसह एका पांढऱ्या स्कॉर्पिओ कारमधून कुठेतरी जात होता. पोलिसांनी आता त्याला पटियाला येथे नेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

SCROLL FOR NEXT