PM Narendra Modi X
देश विदेश

PM मोदींविरोधात विधान भोवलं,पुण्यातील महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Pune News: भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली.

Bharat Jadhav

सागर आव्हाड,साम प्रतिनिधी

पुण्यातील मार्गासा हाइट्समध्ये राहणाऱ्या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करून अपशब्द व शिवीगाळ केली आहे. या महिलेविरोधात काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील एका महिलेनं पंतप्रधान मोदींविषयी अपमानकारक स्टेट्स आणि शब्द वापरले आहेत.त्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ही महिला पुणे शहरातील मोहम्मदवाडी परिसरातील मारगोसा हाइट्स सोसायटी येथे राहते. फराह दिबा असं या महिलेचं नाव आहे. भारतविरोधी आणि पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदविण्यात आलाय. दर महिला सोसायटीतील महिलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर भारतविरोधी भावना भडकावणारे संदेश, तसेच पंतप्रधानांविषयी अत्यंत अवमानकारक आणि अशोभनीय विधाने सातत्याने करत होती.

यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. सामाजिक सलोख्यावरही परिणाम होण्याची शक्यता होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिलं. त्यानंतर सोसायटीतील विविध रहिवाशांनीही स्वतःच्या नावाने लेखी तक्रारी सादर केल्या. यासर्व तक्रारींच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम 152, 196, 197, 352 आणि 353 अंतर्गत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

"कोणताही भारतीय नागरिक अशा देशविरोधी आणि राष्ट्रनायकांविरोधातील विधाने सहन करणार नाही. शिवसेना म्हणून आम्ही भारतीय अस्मिता आणि पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा तीव्र निषेध करतो, असं प्रमोद नाना भानगिरे म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला

बिहारमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मोदींनी परत एकदा पाकिस्तानला इशारा दिलाय. आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला. जर दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले तर भारत त्याला त्याच्या बिळातून बाहेर काढेल आणि चिरडून टाकेल, असं मोदी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT