Robert Vadra Priyanka Gandhi News Saamtv
देश विदेश

Robert Vadra News: रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढणार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED ने घेतली कोर्टात धाव

Money laundering Case: मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर असलेल्या वाड्रा यांच्या विरोधात ईडीने थेट कोर्टात धाव घेतली आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Robert vadra Case: कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर असलेल्या वाड्रा यांच्या विरोधात ईडीने थेट कोर्टात धाव घेतली असून ज्या अटींवर जामीन मंजूर झाला त्या अटींचे पालन केले जात नसल्याचा दावा ईडीने केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (Enforcement Directorate) रॉबट वाड्रा यांना देण्यात आलेल्या जामीनावर आक्षेप घेतला आहे. जामीनासाठी घालण्यात आलेल्या अटींचे पालन केले जात नसल्याची तक्रार ईडीकडून करण्यात आला असून एका प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून ईडी आपले म्हणणे कोर्टासमोर मांडणार आहे.

ईडीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी जामीन अटींचे उल्लंघन केले आहे. ते सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत. ते न्यायालयासमोर ठेवण्यासाठी त्यांनी थोडा वेळ मागितला असून न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ईडीला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. पुढील सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.

काय आहेत आरोप?

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमधील 12, ब्रायनस्टन स्क्वेअर येथे अंदाजे 1.9 दशलक्ष पौंड (17 कोटींहून अधिक) मालमत्ता खरेदीत मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणाची प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अक्ट (PMLA) अंतर्गत चौकशी केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT