उत्तर प्रदेशसाठी प्रियंकांचा नवा नारा- लडकी हूँ, लड सकती हूँ ! INCTwitter/SaamTV
देश विदेश

उत्तर प्रदेशसाठी प्रियंकांचा नवा नारा- लडकी हूँ, लड सकती हूँ ! (पहा व्हिडीओ)

'निवडणूक लढवायची असल्यास पुढे यावं' 'महिलांनी पुढे येण्याची गरज'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींच्या (Elections in Uttar Pradesh) पार्श्वभूमीवरती आज प्रियंका गांधीनी (Priyanka Gandhi) पत्रकार परिषद घेतली त्यांनी या पत्रकार परषदेमध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये काँग्रेस 40 टक्के तिकीट महिलांना देणार असल्य़ाच जाहीर केलं. तसेच "लडकी हूँ, लड सकती हूँ" चा नारा त्यांनी यावेळी दिला आहे.'निवडणूक लढवायची असल्यास पुढे यावं' 'महिलांनी पुढे येण्याची गरज' असल्याचही त्यांनी सांगितलं. (Priyanka's new slogan for Uttar Pradesh - I am a girl, I can fight)

पहा व्हिडीओ -

प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या 'हा निर्णय उत्तर प्रदेश मधील त्या प्रत्येक महिलेसाठी आहे. ज्या महिला न्याय मागतात, ज्यांना उत्तर प्रदेश पुढे जावा असं वाटतं, त्या सर्व महिलांसाठीचा निर्णय असून तुम्ही जर शिक्षिका Teacher असाल समाजसेविका असाल, पत्रकार Journalist असाल तर तुम्ही सर्वांनी पुढं या आणि माझ्या खांद्याला खांदा लावून या निवडणूकीच्या मैदानात उतरा अस आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे. महिलांना साद घालत असताना त्या म्हणाल्या 'तुमची सुरक्षा कोणी करू शकणार नाही. जे सगळ्या गोष्टी करतात लोकांना चिरडतात त्यांचीच सुरक्षा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला तसेच प्रदेशात दिवसाढवळ्या नागरिकांना चिरडलं जातं आहे. आणि हेच आपणाला बदलायच असल्याचही त्या म्हणाल्या.

मला अनेक ठिकाणी अनेक मुली भेटतात त्यांनी मला सांगतात आम्हाला शाळेत School जायच आहे. गंगा तटाच्या किणाऱ्यावरती मला एक मुलीने सांगितलं की मला शाळा शिकायची इच्छा आहे मात्र माझ्या गावात शाळात नाही, एका मुलीने सांगितलं आपणाला पंतप्रधान व्हायच आहे. आणि या सर्वांसाठी सर्व सुविधा देण्यासाठीच आपणाला पुढ यायला हवं असं त्या म्हणाल्या.

तसेच आज घेतलेला काँग्रेसचा हा निर्णय उन्नाव Unnav मधील त्या मुलीसाठी ज्या मुलीला जाळून मारलं हाथरस Hathras मधील त्या आईसाठी आहे जिने माझी गळाभेट घेतली आणि सांगितलं आम्हाला न्याय हवा आहे. असं सांगून त्यांनी युपीत UP होणाऱ्या महिला अत्याचारांवरती सर्वांच लक्ष वेधलं आहे. तसेच योगींच्या Yogi Goverment काळात शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अत्याचारावरती देखील त्यांनी भाष्य केलं लोकांना चिरडून मारलं जात आणि नेते त्यांनाच पाठीशी घालतात हे चित्र चांगल नसल्याचही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT