Priyanka Gandhi SaamTv
देश विदेश

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Vayanad LokSabha By-Elections Result : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.

Saam Tv

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. ४ लाख १० हजार ९३१ मतांनी त्यांनी हा विजय मिळवला. त्यांच्या विरोधात सीपीआयचे सत्यन मोकेरी आणि भाजपच्या नव्या हरिदास या निवडणूक रिंगणात होत्या. यात प्रियांका गांधी यांना ६ लाख २२ हजार ३३८ मते मिळाली, तर सीपीआयचे सत्यान मोकेरी यांना २ लाख ११ हजार ४०७ आणि भाजपच्या नव्या हरिदास यांना १ लाख ०९ हजार ९३९ मते मिळाली.

उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ आणि उत्तराखंडमधील १५ विधानसभा जागांसाठी आणि वायनाड लोकसभा जागेसाठी शनिवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. यात कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसने चन्नापटना, शिगगाव आणि संदूर या तिन्ही मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली आहे. केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत शनिवारी झालेल्या मतमोजणीच्या आठ फेऱ्यांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF उमेदवार प्रियांका गांधी वाड्रा यांनी डाव्या आघाडीचे सत्यन मोकेरी यांच्यावर 3,19,00 मतांनी आघाडी घेतली.

यावेळी लोकसभा पोटनिवडणुकीत गेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानात 09 टक्क्यांनी घट झाली असली, तरी प्रियांका गांधींची मतांची टक्केवारी ६० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर गेली आहे. तर प्रियांका यांच्या विजयाच्या फरकाने गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे भाऊ राहुल गांधी यांनी मिळवलेल्या 3.64 लाखांच्या विजयाचं अंतर पार केलं आहे.

प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभांना महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला होता. 'कनिष्ठ इंदिरा' (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) आणि भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे मोठ्या प्रमाणावर वायनाडमध्ये स्वागत करण्यात आलं होतं. त्याचाच परिणाम हा या निवडणुकीत दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT